एक्स्प्लोर

Nitesh Rane On Shaniwar Wada Namaj Pathan Controversy: नमाज पडायला दुसरीकडे जागा नाही का? ⁠हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा बोललं तर चालेल का? शनिवारवाडा प्रकरणावरून नितेश राणे भडकले

Nitesh Rane On Shaniwar Wada Namaj Pathan Controversy: शनिवारवाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे .

Nitesh Rane On Shaniwar Wada Namaj Pathan Controversy: शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) प्रचंड आक्रमक झाल्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. आता यावरून मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Nitesh Rane On Shaniwar Wada Namaj Pathan: हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा बोललं तर चालेल का?

नितेश राणे म्हणाले की, नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का? उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का? शनिवार वाडा हे आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ आहे. तिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचे पठण सुरू केले तर मग काय करायचे. जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा. वातावरण कोण खराब करत आहेत? कशाला तिथे नमाज पडायचे आहे. नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का? वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक काय? जो आवाज आमच्या कार्यकत्यांनी उचलला तो बरोबर आहे, असे त्यांनी म्हटले. 

Nitesh Rane on Raj Thackeray: मग व्होट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत?

राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी देखील केली. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते त्यावर लोक विचार करतात, असा आतापर्यंत अनुभव आहे. पण, कालच्या झालेल्या सभेनंतर अशा पद्धतीचे  व्होट चोरीचे आरोप हे लोकसभेनंतर का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Nitesh Rane on Raj Thackeray: राज ठाकरेंवर संगतीचा परिणाम

नितेश राणे पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने लोकसभेत एका-एका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा व्होट चोरीचे, व्होट जिहादचे कोणीच आरोप केले नाहीत. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं. तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधाळला गेला त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हिंदुत्व विचारांचे सरकार येण्यासाठी भगव्या गुलालाने दिले. तेव्हाच आता व्होट चोरीचे आरोप व्हायला लागले. राज ठाकरे आजकाल ज्यांचा मांडीला मांडी लावून बसतात, त्या संगतीचा हा परिणाम असू शकतो. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

Suhas Kande: एकनाथ 'भाईं'नी सुहास 'अण्णां'ची ताकद वाढवली, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी; शिवसेनेत प्रथमच 'या' पदाची निर्मिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jarange vs Munde: 'संतोष देशमुखच्या हत्येनंतर माझा नंबर होता', गंगाधर काळकुटेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation: 'सातारा गॅझेटियरमुळे लवकर न्याय', Shivendraraje Bhosale यांचा मोठा दावा
Atal Setu Under Fire: 'फेकनाथ मिंधे, भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलंय', आदित्य ठाकरेंचा घणाघात
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेतील आरोपीचा व्हिडिओ समोर
Land Scam : '200 कोटींची जमीन 3 कोटींत', Vijay Wadettiwar यांचा Pratap Sarnaik यांच्यावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Embed widget