Devendra Fadanvis : संभाजीराजेंच्या पश्चिम महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नेतृत्वाची धास्ती कुणाला? फडणवीसांचा सवाल
संभाजीराजेंचा नेतृत्व विकास हा कोणासाठी चिंतेचा विषय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. छत्रपती शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट देऊन दिशाभूल केली गेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
नागपूरः पश्चिम महाराष्ट्रात (West Maharashtra) संभाजीराजेंचा नेतृत्व चांगल्या पद्धतीनं तयार होत आहे. मात्र याची कोणाला धास्ती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. छत्रपती शाहू महाराजांना काही किडक्या लोकांद्वारे चुकीची माहिती असलेली स्क्रिप्ट दिली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. नागपूरात माध्यमांशी ते बोलत होते.
पुढे फडणवीस म्हणाले, शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं तरीही मी त्या संदर्भात मी बोलणार नाही. या संदर्भात स्वतः संभाजीराजेंनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितलं आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुण सांगतोय, की मी जे बोललो ते सत्य बोललो. ही प्रतिक्रीया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दुखः आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन, आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसत आहे. त्या लोकांना हे समजत नाही की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतायं. तर दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये काही तरी मतभेद आहे असं दाखवण्याच्या प्रयत्न करतायं. त्यामुळे असे जे काम करताय त्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दुखः आहे.
छत्रपती संभाजी राजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगल्याप्रकारे विस्तार झाला असून मराठा आणि बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहे. याचा धोका कोणाला होणार होता, हे साधं राजकारण समजणाऱ्यालाही कळते. हे विस्तार थांबवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
भेटीपूर्वीच अपक्ष उभे राहण्याचा निर्णयः फडणवीस
पुढे फडणवसी म्हणले, केवळ रेकॉर्ड ठिक राहावं म्हणून सांगतो की, छत्रपीत संभाजीराजे मला भेटले होते त्या पूर्वीच त्यांनी अपक्ष उभे राहणार असून आमच्या घराण्याची परंपरा पाहता, मला सर्व पक्षांनी पाठिंबाद्यावा अशी त्यांची इच्छा होती. आमच्या पक्षाचे यासंदर्भातील निर्णय हायकमांड घेत असते, असे त्यांना सांगत सर्व पक्षांनी आपल्याला समर्थन दिल्यास मी हायकमांडसोबत या संदर्भात बोलणार असल्याचे आश्वासनही यावेळी मी दिल्याची कबूली त्यांनी दिली.
हे वाचलं का
Sanjay Raut : संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल; सांगितल्या चार गोष्टी अन् संपवला विषय!