मोठी बातमी: विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली? 100 टक्के निवडून येणाऱ्या 80 जागांचा विचार सुरू; अजित पवारांच्या मंत्र्याचा दावा
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महायुतीतील जागावाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Dharmarao Baba Atram on Assembly Elections Seats: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी महायुतीतील (Mahayuti) जागावाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागांवर निवडणूक लढवेल. शंभर टक्के निवडून येणाऱ्या त्या 80 जागा निवडण्यासाठी पक्षानं राज्यभर सर्वेक्षण सुरू केल्याचा दावा आत्राम यांनी केला आहे. तर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासाही आत्राम यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महायुतीतील जागावाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागांवर निवडणूक लढवेल. शंभर टक्के निवडून येणाऱ्या त्या 80 जागा निवडण्यासाठी पक्षानं राज्यभर सर्वेक्षण सुरू केलं असल्याचा दावाही आत्राम यांनी केला आहे. आमचं टार्गेट 80 जागा लढवण्याचं असून त्यावर 100 टक्के निकाल मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात कुठे कुठे जागा निवडून येऊ शकते? त्या संदर्भात सर्वेक्षण आणि पक्षांतर्गत विचार विनिमय सुरू केल्याचं आत्राम म्हणाले आहेत.
विदर्भात पक्षाचा 20 जागा लढवण्याचा विचार आहे. विदर्भातील सहा जागांवर आधीच आमचे आमदार आहेत, उर्वरित 14 कोणत्या असाव्यात? आणि त्या जागांवर कोणाला उभं करायचं? याचा विचार सुरू केला आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. तसेच, शरद पवार गटाचे उमेदवार जिथे असतील त्या जागा प्राधान्याने आम्ही लढवू, असंही अत्राम यांनी सांगितलं आहे.
अनिल देशमुखांविरोधात एक देशमुखचं उभा करू : धर्मराव बाब अत्राम
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या विरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासा ही आत्राम यांनी केला आहे. अनिल देशमुख विरोधात जर भाजपकडे सक्षम उमेदवार नसेल, तर आमच्याकडे देशमुख कुटुंबातूनच तगडा उमेदवार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही एक देशमुखच उभा करू असा, दावाही त्यांनी केला आहे. या क्षणाला जरी देशमुख कुटुंबाचा कोणीही आमच्या पक्षात नसला, तरी निवडणुकीपर्यंत भरपूर वेळ असून देशमुख कुटुंबातील त्या व्यक्तीला आमच्या पक्षात प्रवेश देऊ आणि उमेदवारी देऊ असा दावाही आत्राम यांनी केला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी चमत्कार दाखवत दुसऱ्या पक्षातील किमान सहा आमदारांचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मिळवलं. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांपैकी जे आमदार भविष्यात आमच्या पक्षात येतील आणि ते सक्षम असतील, तर त्यांना विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षातून उमेदवारी देण्यासंदर्भात आमचा पक्ष निश्चितच विचार करेल, असंही आत्राम म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : Dharmaraobaba Atram Nagpur : महायुतीत राष्ट्रवादीकडून 80 जागांची मागणी, काय म्हणाले बाबा आत्राम?