एक्स्प्लोर

NCP MLA Disqualification Case: कोणाचे आमदार अपात्र, दादांचे की थोरल्या पवारांचे? आज विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात निकाल

NCP Politicle Crisis: राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय संपूर्ण राज्याचं लक्षंही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लागलं आहे. 

NCP MLA Disqualification Case: मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा (NCP MLA Disqualification Case) निकाल आज (15 फेब्रुवारी 2024) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्याकडून दिला जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय संपूर्ण राज्याचं (Maharashtra Politics) लक्षंही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लागलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं (Election Commission) राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबात निर्णय दिला. यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे देण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार गटासमोरील आव्हानं वाढली आहेत. 

अजित पवारांसोबत किती आमदार?

  • महाराष्ट्रातील 41आमदार 
  • नागालँडमधील 7 आमदार 
  • झारखंड 1 आमदार 
  • लोकसभा खासदार 2
  • महाराष्ट्र विधानपरिषद 5 
  • राज्यसभा 1 

शरद पवारांसोबत किती आमदार? 

  • महाराष्ट्रातील आमदार 15 
  • केरळमधील आमदार 1
  • लोकसभा खासदार 4 
  • महाराष्ट्र विधानपरिषद 4
  • राज्यसभा 3

निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आक्रमक झाला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आयोगानं कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव न चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. अशातच पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शरद पवार गटाला आता नवं नाव आणि पक्षचिन्ह निवडावं लागणार आहे. 

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? 

गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील बडे नेते फोडले जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये किती मातब्बर नेते उरतील, याविषयी शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी काँग्रेस (Congress) हायकमांडकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना एक मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवार यांनी त्यांचा गट (Sharad Pawar Faction) काँग्रेसमध्ये विलीन करुन काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याची माहिती मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget