एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: जरांगे म्हणाले तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन, छगन भुजबळ म्हणाले, मी हरलो तरी ओबीसींसाठी लढत राहीन

Maratha Reservation Vs OBC Reservation: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. सरकारी शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंच्या भेटीला जालन्यात.

मुंबई: ओबीसी आंदोलनासाठी छगन भुजबळ हेच सर्व काही पुरवत आहेत. तुमचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला होता. जरांगे यांच्या या आव्हानाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीला छगन भुजबळ घाबरत नाही. उद्या मी घरी बसलो तरी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरुन रस्त्यावर उतरुन लढेन, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. ते शनिवारी जालन्याला लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे, मग आमदारीकचे काय घेऊन बसला आहात. माझं राजकीय करिअर हे पुढे न्यायचं की नाही, हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट हे सर्वश्रेष्ठ आहे. जरांगे म्हणतात त्याप्रमाणे माझं मंत्रिपद गेलं, राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून लढत राहीन, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींपेक्षा जास्त सवलती: छगन भुजबळ

मराठा समाजावर अन्याय करा, असे आम्ही कुठे म्हणतोय. आम्ही म्हणतोय की, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. एवढंच नव्हेतर सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना आज या क्षणाला ओबीसींपेक्षा जास्त सवलती मिळत आहेत. आमचा याला विरोध नाही. मग आणखी काय पाहिजे तुम्हाला, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला. राज्य सरकार घरांची व्यवस्था करत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. कर्जमाफीच्या योजना आखत आहे, फी माफी करत आहे. शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहं उपलब्ध करुन देत आहे, वसतिगृह नसतील तर विद्यार्थ्यांना पैसे देत आहे. मग आता काय अडचण आहे, असे भुजबळ यांनी विचारले.

छगन भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर नाव सांगणार नाही: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर आगपाखड केली होती. ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.

भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा असे म्हणतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा. मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ही रद्द करा.  त्याने टोळी तयार केली आहे. 16 टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतलं, आता दाखवतो. येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले. मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा, असे ते म्हणतात. मराठा नेत्यांनी आतातरी जागे व्हावे. मराठा कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात रद्द करा, याकडे मनोज जरांगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. 

आणखी वाचा

'तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन'; जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget