(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawab Malik : गोव्यात मध्यम वर्गालाही परवडणारं पर्यटन सुरू करणार, राष्ट्रवादीचा जाहीरनामा
गोवा विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा सादर केलाय.
Goa Elections 2022: देशात पाच राज्यांमध्ये निवडणुकां होत आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. यंदा राष्ट्रवादीही गोव्यात निवडणुक लढवत आहे. गोवा विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा सादर केलाय. ज्यामध्ये त्यांनी गोव्यात मध्यम वर्गालाही परवडेल असं पर्यटन सुरू करणार असल्याचे सांगितले. आणखी काय म्हणाले मलिक...
मध्यम वर्गालाही परवडेल असं पर्यटन सुरू करणार.
गोव्यात पर्यटन मोठा विषय आहे. आम्ही कुटुंब पर्यटन सुरू करण्यावर भर देणार आहोत. आता गोव्यात कसिनो बेस पर्यटन सुरू आहे. श्रीमंत लोकांचं पर्यटन सुरू आहे. मध्यम वर्गालाही परवडेल असं पर्यटन सुरू करणार. त्यासाठी स्थानिक लोकांची जी घरं आहेत त्यांना त्यांच्या क्षमते नुसार हाँटेल परवना देण्याची योजना सुरू करणार. त्यासाठी विशेस सबसीडी देऊन होम टूरिझम सुरू करणार. असे नवाब मलिक यावेळी म्हणाले
शेतकरी शेती पासून दूर जातायेत
गोव्यात 62% लोक शहरी भागात राहतात. 38% लोक ग्रामीण भागात राहतात. गोव्याची संस्कृती वेगळी आहे. कृषीराज्य असताना हळू हळू राज्यातील शेतकरी शेती पासून दूर जातायेत. शेतकऱ्यांना जलसंपदा प्रकल्प नाही. आम्ही सत्तेत आल्यावर जलसंपदा विभागावर भर देऊन शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास बळ देऊ. शेतकऱ्यांना जोड धंदा दिला पाहीजे. मत्स्य उत्पादनासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार असून इथल्या शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत. मनरेगातंर्गत ग्रामीण भागात देखील मजूर उपलब्ध करून देऊ. शेतमजूर मिळण्यासाठी विशेष योजना सुरू करणार. या संकल्पनेनुसार देशातील मध्यमवर्गीयांनाही गोव्यात पर्यटनाचा फायदा मिळेल. स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत आम्ही होम टूरिझम साठी प्रमोट करू. त्यासाठी स्थानिक नागरिकांना कर मधून सूट देण्याचीही योजना करणार. त्यासाठी स्थानिक नागरिकांनाही विशेष प्रशिक्षण देणार. फँमिली टुरीझम कल्पनेमुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक फायदा होईल. या माध्यमातून बेरोजगारी कमी होईल. विकास हा झालाच पाहिजे पण पर्यावरणही रोखलं पाहिजे. मायनिंगसाठी NGTचे निकष अंतर्गत राहून जिथे शक्य आहे तिथे मायनिंग सुरू करू. गोव्याचा विकास होत असताना स्थानिक नागरिकांचाही आर्थिक फायदा होणं गरजेचं आहे. आम्ही १३ विधानसभा मतदारसंघ लढवतोय. गैरभाजप सरकार राज्यात येईल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमीका महत्वाची असेल.
गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही
गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गोव्यातील विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत (Majority) मिळणार नसल्याचं भाकित करत गोव्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग होईल असं नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच निकालानंतर भाजप सोडून जी आघाडी होईल त्यांच्यासोबत आम्ही राहू असे मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
- आजचं पत्र फक्त माहितीसाठी, हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचाय : संजय राऊत