Navneet Rana : मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, आता अमरावतीकर विरोधकांना पाणी पाजतील; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
Amit Shah Amravti Sabha : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 33 महिने मातोश्री सोडली नव्हती, ते आता माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी अमरावतीत आल्याची टीका भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केली.
अमरावती : मला पराभूत करण्यासाठी राज्यातल्या दिग्गजांना अमरावतीत यावं लागतंय, यातच माझा विजय आहे. मी तुमच्या जिल्ह्याची सून आणि लेक आहे, मी तुमच्यासाठी माझ्या रक्ताचं पाणी केलंय असं भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या. भाषण सुरू असताना त्यांनी समोरच्या लोकांना पाणी पाजण्याच्या सूचना दिल्या. हेच अमरावतीकर नंतर विरोधकांना पाणी पाजतील असा टोला त्यांनी लगावला.
नवनीत राणा म्हणाल्याकी , "विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना आज या जिल्ह्यात यावं लागतंय हे अमरावतीच्या जनतेचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यश आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी 33 वर्षे मातोश्री सोडली नाही, त्यांना आता अमरावतीत यावं लागलं. अनेक लोक इथं येऊन माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्या कामामुळे मला काही टेन्शन नाही. शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही."
बच्चू कडू आण यशोमती ठाकुर यांच्यावर टीका
खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू आणि यशोमती ठाकुर यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, या आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या 33 महिन्याच्या सरकारमध्ये अमरावतीमधील माझ्या नणंद आणि एक भाऊ हे मंत्री होते. पण त्यांनी एकमेकांच्यात भांडण लावण्याची कामं केली. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी यांनी चोरीची केस म्हणून दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला. तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना हिंदूंचा गळा कापला जात होता, त्यावेळी तुम्ही राजकारण करत होता. यापुढे उमेश कोल्हे प्रकरण घडणार नाही. मी मेळघाटामध्ये अनेक विकास कामं केली. एकही महिलेले बेघर राहू देणार नाही हा मोदींचा संकल्प आहे.
हनुमान चालीसा म्हटलं म्हणून मुंबईच्या जेलमध्ये टाकलं. मी हनुमान चालीसा मुंबईत नाही तर पाकिस्तानात वाचणार का? आता पाकिस्तामध्येही हनुमान चालीसा वाचली जाईल, मोदी असताना हे शक्य आहे असं नवनीत राणा म्हणाल्या.
अमरावतीमध्ये तिरंगी लढत
अमरावती लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू असून दोघांकडूनही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने अमरावतीचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा :