NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन, काका की पुतण्या कोण धडाक्यात साजरा करणार?
NCP Foundation Day: सध्या पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी कोर्टाने कोठेही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बंदी घातली नाही, त्यामुळे दोन्ही गट जोरात वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP Foundation Day) यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळं असणार आहे. कारण या पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत.फुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन आहे. त्यातही अजित पवार यांनी नुकतंच वर्धापनदिन सोहळा धडाक्यात साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाचा 10 जून रोजी होणारा वर्धापनदिन सोहळा जोरदार साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. लवकरच हा सोहळा दिल्लीत, मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा केला जाणार याबाबत देखील घोषणा होणार आहे.
यंदाचं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचं आहे कारण यंदा पक्षाचा 25 वा वर्धापनदिन सोहळा आहे. परंतु पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांना काही कालावधी पुरते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावासह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच अजित पवार यांच्यावतीने वर्धापन दिन साजरा आपण जोरदार साजरा करणार असल्याचं म्हंटलं आहे. सध्या पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी कोर्टाने कोठेही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बंदी घातली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे
शरद पवार गट देखील साजरा करणार वर्धापन दिन
एकीकडे अजित पवार गटाने जोरदार तयारी केली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देखील वर्धापन दिन साजरा करणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे. पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. शिवाय सध्या पक्ष आणि चिन्ह दोन्ही न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे आम्ही देखील वर्धापन दिन 10 जूनला साजरा करु असा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
अजित पवार गट कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता
एकंदरीतच सध्या जरी दोन्ही गटाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी याप्रकरणी दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण अजित पवार यांना पक्ष चिन्ह मिळालं असलं तरी त्यांना सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे हे लिहिणं बंधनकारक आहे तर दुसरीकडे शरद पवार यांना नव्याने पक्षाचे नाव चिन्ह मिळाल्याने याविरोधात अजित पवार गट देखील कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
Ajit Pawar: पुणे अपघात प्रकरणी अजित पवार खोटं बोलतात, त्यांची नार्को टेस्ट करा: अंजली दमानिया