एक्स्प्लोर

Naresh Mhaske : ठाकरेंचे उरलेले तीन खासदारही लवकरच फुटतील, संजय राऊत काँग्रेसचे 'दलाल'; नरेश मस्केंची टीका

Naresh Mhaske Press Conference : खा. नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंचा पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी त्यांना बजावलेला व्हिप (Whip) नाकारत संजय राऊत यांचं थोबाड फोडलं आहे, असा घणाघात म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत शय्यासोबत करत असून केवळ काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर थेट टीका करताना त्यांना 'काँग्रेसचे दलाल' असं संबोधलं. त्यांचा दिवा आता विझत चालला आहे, म्हणूनच ते सध्या जास्त फडफडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Naresh Mhaske vs Sanjay Raut : 'संजय राऊतांचा दम फक्त तोंडात'

खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "संजय राऊत यांचा दम फक्त तोंडात आहे, पण ताकद मनगटात असावी लागते. स्वतः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितल्यानंतर आमदारांनी मतं दिली, म्हणूनच संजय राऊत हे खासदार होऊ शकले. आता ठाकरे गटाकडे केवळ तीन खासदार शिल्लक राहिले आहेत. ते तरी किती काळ तुमच्या सोबत राहतात, ते आता बघाच."

भविष्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष हा संपूर्णपणे काँग्रेसमध्ये विलिन (Merge into Congress) होणार आहे. याच भीतीमुळे आणि याच कारणामुळे त्यांच्या खासदारांनी ही बंडखोर भूमिका घेतली आहे, असा दावा नरेश मस्के यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी या खासदारांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी कधीही थेट भेट होऊ दिली नाही, असा दावाही त्यांनी केला.

Naresh Mhaske On Uddhav Thackeray : अंबादास दानवे यांच्या अर्जावर आमदारांचा आक्षेप?

ठाकरेंच्या पक्षांतर्गत वादावर बोलताना म्हस्के यांनी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या उमेदवारी अर्जाचा उल्लेख केला. अंबादास दानवे यांच्या फॉर्मवर 10 आमदारसुद्धा सह्या करण्यासाठी तयार नव्हते. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हेदेखील त्यासाठी राजी नव्हते, असा दावा म्हस्केंनी केला.

शेवटी पुण्यात एक महत्त्वाची बैठक असल्याचं कारण सांगून त्या आमदारांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्याकडून त्या फॉर्मवर सह्या घेतल्या गेल्या, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
कार्यकर्ते टिकावण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोट बोलातायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  
कार्यकर्ते टिकावण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोट बोलातायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य, शिवसेना भवनातील बैठकीची इनसाईड स्टोरी
सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य, शिवसेना भवनातील बैठकीची इनसाईड स्टोरी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget