Narayan Rane: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, शिंदे गटाला धक्का
Ratnagiri Sindhudurg Lok sabha: रत्नागिरी - सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.
![Narayan Rane: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, शिंदे गटाला धक्का Narayan Rane has been announced as a candidate from Ratnagiri Sindhudurg Constituency lok Sabha Election maharashtra marathi news Narayan Rane: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, शिंदे गटाला धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/18/98ad3b4a3d285e91ac474f49d70ab596171342070824889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ratnagiri Sindhudurg Loksabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.
नारायण राणे उद्या शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सभांचा धडाका लावला होता.
किरण सामंत राणेंचं काम करणार : उदय सामंत
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला.
सामंत बंधूंनी सामंजास्याची भूमिका दाखवली
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी जवळपास नारायण राणेंचे नाव निश्चित होते. अखेर आज घोषणा झाली. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या जागेसाठी इच्छुक होते. रत्नागिरीत सध्या उदय सामंत आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ताकत आहे. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत सामंत बंधूंनी सामंजास्याची भूमिका दाखवली आहे. नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहे. तर सावंतवाडीचे दिपक केसरकर आमदार आहेत. जे सध्या महायुतीमध्ये आहे. उद्या नारायण राणे अर्ज दाखल करणार आहे.
किरण सामंतांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश
किरण सामंत यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले असून अखेर नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा आहे. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
33 महिने किती सहन केलंं आम्हाला माहिती, फडणवीसांना कधीही अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)