नागपूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी जागावाटपाची (MVA Seat Sharing) चर्चा अजून पुढे सरकलेली नाही. त्यामुळे निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली तरी तीन पक्षांचा समावेश असलेल्या दोन्ही आघाड्यांचे जागावाटप कसे पार पडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
नाना पटोले यांना जागावाटबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आमची निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) तयारी सुरु झाली आहे . मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय गणपती उत्सवानंतर होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले.
शोषितांच्या भल्यासाठी काँग्रेसला जातीय जनगणना हवेय: नाना पटोले
काँग्रेसला जातनिहाय जनगणना हt राजकीय फायदासाठी नको आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तसे वाटत असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गैरसमज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. शोषित पीडित समाजाला योग्य न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस ला जातनिहाय जनगणना हवी आहे. जातनिहाय जनगणनेला घेऊन सत्तेला बसलेल्या लोकांना जर राष्ट्रीय ऐक्याला धोका वाटतो याबद्दल नाना पटोले यांनी संघाच्या भूमिकेला घेऊन प्रश्न उपस्थित केले.
आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर
ठाकरे गटाने आमदार आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून नांदेड, हिंगोली, परभणी, जालना,छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाला आहे त्याठिकाणी आदित्य ठाकरे जातील.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाला आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी, तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे. कासारखेडा जिल्हा नांदेड, डोंगरगाव तालुका कळमनुरी, वझूर तालुका मानवत, बोरगव्हाण तालुका पाथरी, पांगरी तालुका मंठा, अंबडगाव तालुका बदनापूर, पाचोड तालुका पैठण या ठिकाणी आदित्य ठाकरे उद्या पाहणी दौरा करणार आहेत.
आणखी वाचा
जागावाटप कधी पूर्ण करायचा हा स्ट्रेटेजीचा भाग; उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांचे सूचक वक्तव्य
विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला!