एक्स्प्लोर

मोदी-शाह-फडणवीसांनी महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय, एकनाथ शिंदे देशातील सर्वात लोचट मुख्यमंत्री: संजय राऊत

महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं. असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'मुख्यमंत्री लोचट मजनू' अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केलीये. मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक्का असे म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात कोणी सावत्र नाही सावत्र दिल्लीत बसलेत. असं राऊत म्हणाले. 

लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय

मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय  लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत. असे खासदार संजय राऊत म्हणाले. 

सावत्र महाराष्ट्रात नाही दिल्लीत बसलेत: संजय राऊत

या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. सावत्र आहेत ते दिल्लीत बसलेत. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देतात. महाराष्ट्राचा सावत्र नाही भाऊच नाहीत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केलं तेवढं 100 वर्षात कुणी केलं नाही. 
मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक का असे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेत भरघोस वाढ करू 

सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळायलाच हवे. पण पंधराशेच्या आकड्यात आमचं सरकार आल्यावर  भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. कुठे देण्यात आले एकेक आमदाराला 50 -50 कोटी देण्यात आले. काही जणांना शंभर शंभर कोटी देण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येतात. पण लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये, अशी जोरदार टीका राऊतांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं

महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं. पैसा आणि सत्य समोर महाराष्ट्र झुकला जाणार नाही हे आम्ही लोकसभेत दाखवून दिलं. 

नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातोय

पोलीस यंत्रणेचा धाक दाखवून पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा. उदाहरणार्थ नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातोय. कारण ते मोदीशहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून आले. पन्नास खोकला विकले गेले नाहीत. तुमचा हिशोब द्या असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Embed widget