एक्स्प्लोर

Prasad Lad: ही निवडणूक मी एकट्याने जिंकली, भाजपने मदत केली नाही, ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा; प्रसाद लाडांची घणाघाती टीका

Prasad Lad: उबाठाने महानगरपालिका निवडणुकीच्या आधी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मात्र तो, त्यांच्यावरतीच उलटला असंही लाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुंबई : मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (BEST Election २०२५) निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या गटाने बेस्ट पतपेढीवरील तब्बल नऊ वर्षांची सत्ता गमावली असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. दरम्यान, या निकालानंतर भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे, त्यांना या निवडणुकीमध्ये भोपळा मिळाला आहे, उबाठाने महानगरपालिका निवडणुकीच्या आधी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मात्र तो, त्यांच्यावरतीच उलटला असंही लाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला 

प्रसाद लाड म्हणाले, महायुती म्हणून मी लढलो नव्हतो. श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड प्रणित ही निवडणूक लढलो होतो आणि त्या निवडणुकीत सात जागा मिळाल्या आहेत आणि चार जागांवरती मतमोजणी सुरू आहे, पहिली गोष्ट तर सात जागा मिळाल्या की नऊ मिळाल्या 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलवाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या, याचा मला जास्त आनंद आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा नाही, सहकारातली माहिती नाही, सहकार कसा चालतो माहित नाही, एखादी संस्था 25 वर्षांपूर्वी हातात आली, तिला ओरबाडून काढण्याचा काम या लोकांनी केलं. त्यामुळे महामुंबईतल्या कामगारांनी, मुंबईतल्या जनतेने, मुंबईतल्या मराठी माणसाने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँडचा धुवा उडवला. आता तरी मीडियाच्या माध्यमातून मराठी मीडियाच्या माध्यमातून ठाकरे ब्रँडचा बोलबाला बंद होणार आहे का? असा प्रश्न मला विचारायचा आहे असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

मी सकाळी वाट पाहत होतो की, संजय राऊत काहीतरी बोलतील. पण, ते बोलले नाहीत. निवडणूक हरले की, बॅलेट पेपरवर नव्हती म्हणून हरले, पैसे वाटले म्हणून हरले, लोक विकत घेतली म्हणून हरले, दादागिरी केली म्हणून हरले, आरोप केले म्हणून हरले, पोलीस पाठवले म्हणून हरले, ही एक स्टॅंडर्ड लाईन यांना उद्धवजींनी लिहून दिलेली आहे आणि त्या लाईनवरती त्यांचा बोलबाला असतो. माझं म्हणणं आहे की, मुंबईतल्या जनतेने शशांकराव आणि प्रसाद लाड हे दोघेही ज्या पद्धतीमध्ये ठाकरे गटाच्या विरोधात किंवा ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले आणि खासकरून उबाठा ठाकरेंच्या विरोधात लढले त्याला जनतेने त्यांची जागा दाखवली आहे, असंही पुढे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

आरोप करणं फार सोपं असतं...

पैसे दिले गेल्याचा आरोप केला जात आहे, त्यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले, तो नवीन नवीन कोंबडा आता तयार होतोय,  मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का? तर आता त्याला कळेल काय त्याची परिस्थिती झाली आहे ती, खरं असं आहे की, आरोप करणं फार सोपं असतं. सहकारामध्ये काम करणं संस्था उभी करणे, संस्था मोठी करणे, संस्था चालवणं, फार कठीण असतं. संदीप देशपांडे असतील संजय राऊत असतील यांनी एखादी संस्था चालवावी. एखादी संस्था उभी करून दाखवावी. ठाकरे असतील किंवा ठाकरेंच्या पक्षातील लोक असतील, त्यांनी एक तरी कुठली संस्था चालू केली आहे का? आदित्य ठाकरेंनी कोणती शाळा चालू केली आहे का? एखादा हॉस्पिटल चालू केला आहे का? एखादी पतसंस्था एखादी बेरोजगार संस्था एखादी मजूर संस्था एखादी पगारदार संस्था चालवली आहे का? यांना फक्त आरोप करता येतात, आरोपा पलीकडे त्यांना काहीही करता येत नाही असंही पुढे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

सातचा आकडा कदाचित 17 असता 

महानगरपालिकेच्या लिटमस टेस्टमध्ये तर आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत. एक अकेला सब पे भारी हे म्हणतात, त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा लढला आहे, ज्यामध्ये दरेकर यांची मदत झाली. कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी ज्यांनी सहकारात काम करतात त्यांनी मदत केली. तर सर्वांचा मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे, कारण हा विजय खऱ्या अर्थाने सहकाराचा आहे, माझ्याजवळ पाच जागा 32, 35, 39 आणि 43 मतांनी पडल्या. त्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी होती की यामध्ये 2158 मताही अवैध झाली, त्यामुळे 2158 मतं जर अवैध झाली नसती, तर कदाचित जर शंभर मत माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती. तर हा आकडा सातचा आकडा कदाचित 17 असता आणि अवैध झालेल्या 2158 मतदान पैकी जवळजवळ 1700 मतं ही माझ्या पॅनलची अवैध झाली, असंही पुढे लाड म्हणालेत.

मला एकच सांगायचं आहे, शशांकराव देखील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वाला मानतात, परंतु मला त्यांच्यावर कोणतीही टीका करायची नाही. जे काही निर्णय होईल जे काही चर्चा होईल ती त्यांच्याशी बसून करून परंतु शशांकराव निवडणुकीत मी कोणताही आरोप केला नाही. माझा टार्गेट फक्त शिवसेना होती. शिवसेनेचा भ्रष्टाचार होता. विकत घेतलेले बंगले सहा कोटीचे बंगले 24 कोटीला घेतले, चार कोटीचा कार्यालय नऊ कोटीला घेतलं. बॅग मधला भ्रष्टाचार, डिपॉझिट मधला भ्रष्टाचार, मुंबईमधल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं. शरदरावांनी चाळीस वर्ष बीएसटी आणि मुंबई महापालिकेवरती सत्ता आहेत शिवसेनेचे 25 वर्ष आहे आणि प्रसाद लाड याची श्रमिक उत्कर्ष सभा दीड वर्ष आहे, आता दीड वर्षाच जर सात जागा जिंकू शकतो, तर प्रसाद लाड पुढच्या पाच वर्षानंतर निश्चितपणे 21 च्या 21 जागा जिंकू शकतो हे खात्री मला आहे असेही पुढे लाड यांनी म्हटलम आहे.

आम्हीही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार, मुंबई मधल्या जनतेला ठाकरे ब्रँड हवाय, दोन ठाकरे एकत्र आलेत. मला या पूर्ण निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे एक व्यक्ती सोडली तर मनसेचा एकही कार्यकर्ता या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत होते की नव्हते हा प्रश्न देखील यामध्ये आहे, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा पूर्ण करेक्ट कार्यक्रम या माध्यमातून दिसून येत आहे.

या निवडणुकीमध्ये 2,158 मतं अवैध झाली आहेत, कुठल्याही निवडणुकीमध्ये 2158 मत म्हणजे खूप आहेत, मला वाटतं की ठाकरेंना 2158 मत देखील मिळालेली नाहीत, म्हणजे ठाकरे ब्रँडची पूर्ण मतं काढली तर ती 2158 नाहीत. त्यापेक्षा अवैध मत 2158 जास्त असतील, त्यामुळे मला वाटतं की ठाकरे ब्रँड चार नंबरला गेला. एक नंबरला शशांकराव, दोन नंबरला श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड, तीन नंबरला अवैध मत आणि चार नंबरला ठाकरे ब्रँड. आता तरी ठाकरे ब्रँडने विचार करायला हवा आणि दुसरी गोष्ट ही अवैध मत कशा पद्धतीत होतात, त्या निवडणुकीच्या गडबडीत अडीच लाख मतांची मतपत्रिकांची मोजणी असते. त्यामुळे अवैध मतही बरोबर केली गेली का? केली गेली की नाही? याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील आणि त्यामधून कदाचित अवैध मतपत्रिकेतून आमचाही फायदा होऊ शकतो. रावसाहेबांचा ही फायदा होऊ शकतो, जे उमेदवार हरले त्यांना न्याय मिळेल, ही माझी भावना आहे असेही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 

मी काल रात्री अवैध मतपत्रिकेबाबत पत्र दिलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल, मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू होईल. शिवसेना ठाकरे गटाला वाटलं राज ठाकरेंचं नाव वापरल्यानंतर त्यांना मराठी माणसाचा सपोर्ट मिळेल, सहानुभूती मिळेल त्यांनी हा महापालिकेच्या आधीचा नेरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तो नेरिटिव्ह त्यांच्यावर उलटला. त्यामुळे ही निवडणूक सहकारातली होती, ही निवडणूक एकट्या प्रसाद लाडची होती, ही निवडणूक प्रसाद लाडच्या श्रमिक उत्कर्ष सभा आणि त्यांनी घेतलेल्या सर्व एकत्रित संघटनांची होती. सुभाष सामंतांनी बीएसटीच्या कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग यांनी बेस्ट कामगार पतपेढी भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का? आणि कामगारांना न्याय देणार का? हा प्रश्न आहे असेही प्रसाद लाड यांनी पुढे म्हटलं आहे.

निकालाचे समीकरण

* एकूण जागा : २१
* शशांकराव पॅनेल : १४ जागा
* सहकार समृद्धी पॅनेल (प्रसाद लाड, नितेश राणे, किरण पावसकर): ७ जागा
* उत्कर्ष पॅनेल (राज ठाकरे – उद्धव ठाकरे) : ० जागा

ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित  श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Accident: कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
Pune crime news: पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Accident: कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
Pune crime news: पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Embed widget