एक्स्प्लोर

Mumbai BEST Election: 24 तास आधी चौकशीची नोटीस, मग मतदारांच्या घरी पाचशेच्या नोटा असणारी पाकिटं पोहोचली; बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीपूर्वी रंजक घडामोडी, मनसेचे संदीप देशपांडे संतापले

BEST Election 2025: बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने 21 संचालकांना नोटीस पाठवल्या होत्या, त्यानंतर आता सहकार समृद्धी पॅनेलकडून पैसे वाटल्याचा आरोप

Mumbai BEST Election: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुंबईत मतदान पार पडत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत बेस्ट कर्मचारी संघटनेतील तब्बल 15 हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले आहे. गेल्या 25 वर्षांपासून बेस्ट पतसंस्थेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. या काळात पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे 24 तास शिल्लक असताना दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस धाडली होती. यावरुन भुवया उंचावल्या असतानाच आता मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार समृद्धी पॅनेलने मतदारांना बंद लिफाफ्यातून पैसे पाठवल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले. (BEST employees co operative credit society Election news)

आज बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. अनेक पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत अतिशय घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. मतदारांना पैशांचं आमिष दाखवले जात असून त्यांच्या घरी पैसे पाठवले जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. दत्तात्रय पेडणेकर यांच्या घरी सहकार समृद्धीचे एक पॅम्प्लेट पाठवण्यात आले होते. या पॅम्प्लेटच्या आत एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा होता. त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा होत्या. इतक्या घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढवली जात असतील तर आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत. मात्र, बेस्टचे सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान  होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होईल. या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती प्रणित संघटनांचा सामना पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित  श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल बाजी मारणार की सहकार समृद्धी पॅनल? याची उत्सुकता असणार आहे. या दोन पॅनल व्यतिरिक्त बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत असल्यामुळे बेस्ट पतपेढीमध्ये सुद्धा मागील नऊ वर्षापासून बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व आहे.


* 15093 मतदार ( यामध्ये बेस्ट कर्मचारी चालक वाहक बेस्ट विद्युत पुरवठा कर्मचारी)
* 29 - मतदान केंद्रावर मतदान होणार ( हे मतदान केंद्र बहुतांश बेस्ट डेपो आहेत)
* 21 जणांचं पॅनल दोन्ही बाजूंनी उभा आहे 
* सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरू होईल 
* 19 ऑगस्टला मतमोजणी होईल

BEST employees co operative credit society Election: कोणत्या संघटनांचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ?

उत्कर्ष पॅनल (ठाकरे बंधू)

एकूण 21 उमेदवार
19- बेस्ट कामगार सेना  ( ठाकरेंची शिवसेना संघटना)
2- मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना ( मनसे संघटना)

 सहकार समृद्धी पॅनल - एकूण 21 उमेदवार
8 - श्रमिक उत्कर्ष सभा ( भाजप प्रणित संघटना )
5 - समर्थ बेस्ट कामगार संघटना ( नितेश राणे यांची भाजप प्रणित संघटना )
4 - राष्ट्रीय कर्मचारी सेना ( शिंदे शिवसेना प्रणित संघटना )
3 - एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन 
1 - दि इलेक्ट्रिक युनियन

 दि बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल 
* 21  - शशांकराव पॅनल यांचे उमेदवार असतील

आणखी वाचा

बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीला 24 तास शिल्लक अन् 21 संचालकांना EOW कडून चौकशीची नोटीस, मतदानापूर्वी मोठा ट्विस्ट

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget