एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज ठाकरेंना मोठा धक्का! तिकडे नारायण राणेंचा प्रचार, इकडे मनसे सरचिटणीसाचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kirtikumar Shinde Joins Shiv Sena Shinde Group : राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देताच सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा झटका बसला आहे. राज ठाकरेंच्या शिलेदाराने मनसेला 'जय महाराष्ट्र' करत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे. राज ठाकरेंच्या इंजिनाची साथ सोडतं, शिंदेंनी हाती मशाल घेतली आहे.

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला गुढीपाडवा सभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंचे शिलेदार आणि मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला राम-राम केला. यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

तिकडे नारायण राणेंचा प्रचार, इकडे मनसे सरचिटणीस ठाकरे गटात

एकीकडे महायुतीला पाठिंबा दिलेले राज ठाकरे यांच्यासह मनसे महायुतीच्या प्रचार करताना दिसत आहे. तिकडे शनिवारी राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीत सभा घेतली आणि इकडे राज ठाकरेंच्या शिलेदाराने त्यांना मोठा धक्का दिला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली आहे. 

किर्तीकुमार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी 'मातोश्री' येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला.
 
मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
आज देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाजघटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शि व से ना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट 'जादुई' संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाह 'भामोशा' विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धवजी घेत असलेले अतुलनीय, कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
 
- कीर्तिकुमार शिंदे
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget