एक्स्प्लोर

'आम्हाला डिवचू नका, सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार'; राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा थेट इशारा

Shiv Sena vs MNS : राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून सुपाऱ्या फेकल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाणे : जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही पण तुमच्या घरात घुसू. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) शांत बसायचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्हाला डिवचू नका, सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल, असा इशारा मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला. या राड्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच वाद सुरु आहे. राज ठाकरेंनी सुपारी फेकीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना माझ्या नादी लागू नका, असा इशाराच दिला आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे नेते आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल : अविनाश जाधव 

या वादावरून अविनाश जाधव म्हणाले की, जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही पण तुमच्या घरात घुसू. राज ठाकरेंचा शांत बसायचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्हाला डिवचू नका. पण परत कोण मस्ती केली तर आम्ही गप्प बसणार नाही हेही लक्षात ठेवा. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. आमची तिकडे गरज नाही. तिकडे जर काही झाले तर तिकडचे कार्यकर्ते सक्षम आहेत. राज ठाकरेंवर प्रेम करणारे हजारो वेडे आहेत. सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

तुमच्याकडे प्रस्थापित आहेत तर माझ्याकडे विस्थापित : राज ठाकरे 

दरम्यान, राज्यात मनसे पुन्हा एकदा आक्रमक शैलीत परतल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यानंतर, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ आणि शेण मनसेने फेकले होते. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिला. माझ्या नादी लागू नका, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहोळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.   

आणखी वाचा

मनसेचा राडा... मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळखट्याक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
Wardha : दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
मोठी बातमी! अखेर  लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM:  10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP MajhaZero Hour : Iphone 16 सीरीज एआयसह लाँच, सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्टNagpur Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी महालक्ष्मीचं आगमनABP Majha Headlines : 8 PM:  10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
Wardha : दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
मोठी बातमी! अखेर  लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Jayant Patil: अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
Embed widget