एक्स्प्लोर

Dadar Kabutar Khana: मंगलप्रभात लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यासाठी पडद्यामागून हालचाली? राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

Dadar Kabutar Khana: दादर येथील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दादर मधील कबूतर खाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Dadar Kabutar Khana: भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दादर कबूतर खाण्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. सकाळपासूनच त्याबाबतच्या बातम्या समोर आल्या होत्या राज ठाकरे यांची मंत्री मंगल प्रभात लोढा हे भेट घेणार आहेत. त्यानंतर पाच ते साडेपाच दरम्यान मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादर येथील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दादर मधील कबूतर खाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.  लोढांकडून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का? अशा चर्चा देखील सुरू आहेत.

कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात आली आहे. तसेच दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज  (Jain Community) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळलं होतं. कबुतरखानाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपली रोखठोक भूमिका व्यक्त करत मंत्री मंगल फ्रभात लोढा यांना सुनावलं होतं. कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. यादरम्यान, राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला होता. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय,  मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी तेव्हा म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

3 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत (शिवसेना नेते) यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याने मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर, बीएमसीने शहरातील कबुतरखान्यांविरुद्ध मोहीम सुरू केली ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबुतरखान्याना बंद करण्यात आले. दादर पश्चिम येथील कबूतरखाना पालिकेने ताडपत्री लावून बंद केला. या नंतर जैन धर्मीय यांच्याकडून थेट कबुतरखाना खुला करावा म्हणून आंदोलन झाले आणि त्यांनी दादर येथील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुन्हा कोर्टात सुनावणीला गेले आणि न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 31 तारखेला होईल, असे म्हणत आंदोलनावर ताशेरे ओढले. कबूतरखाने बंदच राहतील, असे आदेश देखील न्यायालाने दिले. कोर्टाने दिलेले आदेश असताना ही, आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबुतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम सुरूच आहेत. काही जण गच्चीवर कबूतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget