एक्स्प्लोर

Imtiaz Jaleel: नितेश राणे शेंबडा पोरगा, चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला फटकावलं असतं: इम्तियाज जलील

Maharashtra Politics: भाजप आमदार नितेश राणे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पोलीस कर्मचाऱ्यांबाबत केलेले एक वक्तव्य वादाचा विषय ठरत आहे. त्यांनी पोलिसांना थेट बदली करण्याचा इशार दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे.  नितेश राणे हा शेंबड पोट त्याला महत्व देऊ नका.चांगला  पोलीस अधिकारी असता त्याला मारलं असतं. राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा (Nitesh Rane) घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी मंगळवारी  सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन पोलीस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र, बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

पोलिसांनो, मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू; भर सभेत नितेश राणेंची धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget