एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार! 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन पुन्हा रण पेटणार, मनोज जरांगे आता पुन्हा उपोषणाला बसणार. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता. 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

जालना: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता. 

मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. 

राजेंद्र राऊतांवर जरांगेंची टीका

गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतल्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना इशारा दिला. ते रक्त सांडेल म्हटले. मला थेटला तर मी सोडत नाही. मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाची दादागिरी चालणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र, दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातील वाकयुद्धाला धार चढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

मनोज जरांगेंनी पाडापाडी करू नये, जिंकण्यासाठी निवडणूक लढवावी, मी त्यांच्या पाठीशी : छत्रपती संभाजीराजे

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित, 64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षणदुपारी 1 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 17 September 2024Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित, 64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Embed widget