Walmik Karad: न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'
Walmik Karad: सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे.
Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Murder Case) संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आजपासून सीआयडीने चौकशी सुरु केली आहे. सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे. एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जात आहे.
न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला...
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री उशीरानं झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून सीआयडीने वाल्मिक कराडची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले. यावेळी न्यायालयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला एक प्रश्न विचारला. पोलीस विरोधात तक्रार आहे का?, असा प्रश्न वाल्मिक कराडला विचारला. यावर वाल्मिक कराडने लगेच नाही असं उत्तर दिलं.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली-
वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही, दरम्यान कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे. काल रात्री सीआयडीने वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला कोठडी मिळाल्यानंतर बीडमधील जेलमध्ये ठेवण्यात आलं. वाल्मिक कराडला रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा त्याने पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड 22 दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला?
वाल्मिक कराड पुण्यात शरण आला मात्र तो 22 दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर सुरूवातीचे दिवस तो पुण्यात राहिला. यानंतर साधारण आठ दिवसापूर्वीनंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची माहिती उघड झालीय. त्यानंतर राज्याबाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यामध्ये देवदर्शन केलं.