Manoj Jarange Patil Mumbai Morcha Traffic Route Change: मनोज जरांगे मुंबईत दाखल; मुंबईच्या वाहतुकीत बदल, अनेक मार्गावर पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Traffic Route Change: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. यादरम्यान मुंबईच्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Traffic Route Change मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच केलीय. मराठा आंदोलक आज सकाळी मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आहेत. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
मुंबईत वाहतुकीत बदल, पोलिसांनी काय म्हटलंय?
वाहतूक विभागाच्या हद्दीत दि.२९/०८/२०२५ रोजी संभवतः आयोजक मनोज जरांगे यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेला असुन सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथे दि.२९/०८/२०२५ रोजी येणार आहे. सदरचा मोर्चा हा बीड येथून निघून नवी मुंबई मार्गे सायन- पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेवून आझाद मैदान येथे जाणार आहे. सदर मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने तसेच सदरच्या मोर्चामधील लोक हे पायी, मोटर सायकल, मोटर कार/टेम्पो/ट्रक इत्यादी वाहनांनी येणार आहे. तरी वाहतुकीच्या आदेशाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंदी (आवश्यकतेनुसार) व वाहने उभी करण्यास मनाई असलेले मार्ग व अवजड वाहने यांना दि. २९/०८/२०२५ रोजी रात्रौ ००.०० पासुन पुढील आदेशापर्यंत बंदी राहील :-
१) वाशी कडुन येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
२) वीर जिजाबाई भोसले मार्गाकडुन ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
३) छेडानगर वरून फिवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे.
पर्यायी मार्ग :-
१) वाशीकडुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टि जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेवुन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
२) घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे व फिवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
३) छेडानगर वरून फिवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने उजवे वळुन घेवुन अमरमहल, नेहरूनगर ब्रीज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
सदर आदेश हे दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील.
























