Manoj Jarange On Pawar-Bhujbal Meeting : छगन भुजबळ अन् शरद पवारांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दीड तासांची भेट, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Manoj Jarange On Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अपॉईंटमेंट नसताना देखील छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते.
Manoj Jarange On Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अपॉईंटमेंट नसताना देखील छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक पाहायला मिळाले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरोधात टोकाची वक्तव्य केली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी एबीपी माझाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ गेला काय आणि राहिला काय आणि कुठे बसलाय काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. ते लय बेईमान आहे, लय बेइमानी करत ते, जिथे खातो तिथेच घाण करतो. त्याच्या नरड्यात किती हात घाला कोरडाच निघणार आहे. तो कोणाचाच नाही ते फक्त स्वतःच घर कसं भरायचं, हेच बघतो. सरकार आणि विरोधक सारखेच आहेत. सामान्य जनतेचे यांना देण घेण नाही. हे यांच्या यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा हे सांगणार नको जाऊ, यांचं राजकारण यांनी सेटल करून घेतलंय.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ काय काय म्हणाले?
मी आज पवार साहेबांकडे गेलो होतो. मी त्यांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं. साधारण सव्वा दहा वाजता मी गेलो. ते घरी झोपले होते. त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे मी थोडं थांबलो. ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ते बिछाण्यावरच होते. तब्बेत बरी नसल्याने ते उठले होते. साधारण आम्ही दीड तास विविध विषयावर चर्चा केली. मी पवार साहेबांना सांगितलं, मी काही राजकारण घेऊन आलेलो नाही. मंत्री म्हणून नाही, आमदार म्हणून आलेलो नाही. कुठली पक्षीय भूमिका माझी नाही. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहेत मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, काही लोक ओबीसी, धनगर किंवा कोणत्याही समाजाच्या दुकानात जात नाहीत, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे. त्यांना एक आठवण करुन दिली, बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना, मराठवाडा पेटला होता, त्यावेळी शांत करुन तुम्ही निर्णय घेतला आणि सरकारचं जे काही होईल ते होईल, याचा विचार न करत बाबासाहेबांचं नाव दिलं. आजची परिस्थितीही काहीशी तशीच आहे. तुम्ही बैठकीला आले नाहीत. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही, जरांगेंना मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय चर्चा केली, काय आश्वासने दिली माहिती नाही. तुम्ही अखेर ओबीसी नेत्यांची उपोषण सोडायला गेला, त्यांना काय सांगितलं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. जरांगेंना सरकारने काय सांगितलं हे मला माहिती नाही. ते तुम्ही शरद पवारांनी विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं. तुम्ही आज राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि सर्व समाजघटकांची गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे.
इतर महत्वाच्या बातम्या