एक्स्प्लोर

Manikrao Kokate on Ajit Pawar: अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; दादांच्या आमदारानं स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar MP: अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू, एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, असा दावा अजित पवारांच्या आमदारानं केला आहे.

Manikrao Kokate on Ajit Pawar: मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) मधील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यावर सिन्नर (Sinnar) मधील आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar Group) यांनी सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू असं माणिकराव कोकाटे म्हणाले. एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, तसं आम्ही परवाच्या बैठकीत बोलूनही दाखवलं, रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू : माणिकराव कोकाटे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे बोलताना म्हणाले की, "अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू, एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, अजितदादा यांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारण पाहिजे, या काळात आम्ही जर अजित दादांना सोडलं, तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू."

अजित पवार यांना आमदार सोडून जाणार या सर्व बातम्या चुकीच्या : माणिकराव कोकाटे 

"सिन्नरच्या विकासासाठी जेवढे पैसे अजित पवार यांनी दिले आहेत, तेवढे पैसे एकाही सरकारनं दिले नाहीत. अजित पवार यांना आमदार सोडून जाणार या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, अतिशय सोयीस्कर रित्या पसरवले आहेत. परवा झालेल्या बैठकीत अजित दादा यांच्या सोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, राजकीय डाव असू शकतो. एकाही आमदारानं त्या अनुषंगानं माझ्यासोबत चर्चा केलेली नाही. अजित दादांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे.", असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं आहे. 

अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे परत जाणार? 

बारामतीत यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. निकालानंतर बारामतीचा निकाल फारच धक्कादायक होता, अशी प्रतिक्रिया खुद्द अजित पवारांनी दिली. अशातच सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर अजित पवार गटातील काही आमदारांनी सुळेंना शुभेच्छा संदेश पाठवल्याचा दारा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न अजित दादांच्या आमदारांकडून करण्यात आल्याचंही शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. तेव्हापासूनच अजित पवारांचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

पाहा व्हिडीओ : Manikrao Kokate : एकही आमदार दादांना सोडून जाणार नाही : मणिकराव कोकाटे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM:  02 JULY  2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024ABP Majha Headlines :  8:00AM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Juhi Chawla On Shahrukh Khan : 'क-क-क किरण'कसा झाला  बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
'क-क-क किरण'कसा झाला बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
MLC Election 2024: उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात? मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स
उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात? मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स
Embed widget