Malegaon sugar factory election result 2025: अजितदादांनी माळेगावच्या निवडणुकीत सगळ्यांना झोपवलं पण चंद्रकांत तावरेंनी विजय खेचून आणला
Malegaon Election Result 2025: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन हिणवत निकालात काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तावरे हे एकटे निवडून आले.

Malegaon Election Result 2025: संपूर्ण राज्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बहुचर्चित अशा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखालील नीळकंठेश्वर पॅनेलने(Nilkantheshwar panel) दणदणीत विजय संपादन केला. नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकत शरद पवार यांचे बळीराजा पॅनेल आणि चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांच्या पॅनेलचा सुपडा साफ केला. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्याने त्यांच्या दिमतीला प्रचंड मोठी यंत्रणा होती. अजित पवार यांनी प्रचारादरम्यान कारखान्याला 500 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अजित पवार ही निवडणूक सहजपणे म्हणजे 21-0 अशी जिंकून विरोधकांना व्हाईटवॉश देतील, असा अंदाज होता. मात्र, या निवडणुकीतील सर्वात बुजुर्ग उमेदवार चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) यांनी अजित पवारांचे हे स्वप्न पूर्ण होऊन दिले नाही. अजित पवारांच्या अजस्त्र यंत्रणेपुढे शड्डू ठोकत चंद्रराव तावरे यांनी दिमाखात विजय मिळवला. चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून विजयी झाले. त्यामुळे सहकार पॅनेलला एकमेव जागेवर विजय मिळाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन लक्ष्य केले होते. 'आता तुमचं वय झालं, 85 वर्षे झाले तरी थांबायला तयार नाही', असे अजित पवारांनी म्हटले होते. चंद्रराव तावरे यांनीही अजित पवार यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. 'राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे चेअरमन व्हायला निघाले आहेत. त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा कमी केली. उपमुख्यमंत्री मीच, मंत्री मीच, आमदार मीच, कारखान्याचा चेअरमन मीच... सगळीकडे मीच', अशी अजित पवारांची वृ्त्ती असल्याचा टोला चंद्रकांत तावरेंनी लगावला होता.
Chandrarao Taware Victory at Malegaon Election: चंद्रराव तावरेंवर वयाच्या मुद्द्यावरुन टीका झाली, पण मतदारांचा विश्वास कायम
या निवडणुकीत 85 वर्षांच्या चंद्रराव तावरे यांच्यावर अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. तुम्ही 85 वर्षे होऊनही थांबायला तयार नाही, असे अजित पवारांनी म्हटले होते. अजितदादांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने याच मुद्द्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सहकार पॅनेलने या टीकेला अभिमानाच्या भावनेत बदलले. त्यामुळे सर्व पॅनेलमध्ये वयाने सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या चंद्रराव तावरे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला.
Ranjan Taware Sahakar Panel: सहकार पॅनेलच्या रंजन तावरेंची अजित पवारांवर टीका
माळेगाव कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहकार पॅनेलच्या रंजन तावरे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले.आजच्या पराभवाने आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने नेतृत्वाने नैतिकतेच्या मार्गाने विजय कसा मिळवायचा, यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ जावे. त्यांनी सत्तेचा पुरेपुर गैरवापर केला. सर्व शासकीय यंत्रणाचा वापर करीत दबावतंत्राद्वारे माळेगांवच्या सभासदांना वेठीस धरण्याचे काम केले. माळेगांवला मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाले. त्यांनीच यासाठी आत्मचिंतन करावे. नेतृत्वाला माळेगावला कशासाठी ९ दिवस तळ ठोकुन थांबावं लागलं. चेअरमन पद मिळविण्यासाठी हे सर्व केले. दोन आमदार एक मंत्री कामाला लावून मिळविलेला विजय हा नैतिकतेला धरुन नसल्याचे रंजन तावरे यांनी म्हटले. या निवडणुकीत रंजन तावरे यांचा 362 मतांनी पराभव झाला.
Malegaon Sugar Factory Winning Candidate List: माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
रतनकुमार भोसले
भटक्या विमुक्त जाती जमाती
विलास देवकाते
इतर मागास प्रवर्ग
नितीनकुमार शेंडे
ब वर्ग
१) अजित पवार
महिला राखीव प्रवर्ग
१) संगीता कोकरे
२)ज्योती मुलमुले
उत्पादक गट क्र.१ माळेगाव
१) शिवराज जाधवराव
२) राजेंद्र बुरुंगले
३) बाळासाहेब तावरे
गट क्र. २ पणदरे
१) योगेश जगताप
२)तानाजी कोकरे
३) स्वप्निल जगताप
गट क्र. ३ सांगवी
१) गणपत खलाटे
२) विजय तावरे
३)चंद्रराव तावरे
गट क्र. ४ खांडज-शिरवली
१) आटोळे प्रताप
२) फाळके सतीश
गट क्र. ५ – निरावागज
१) देवकाते अविनाश
२) देवकाते जयपाल
गट क्र. ६ – बारामती
गावडे देविदास
सातव नितीन























