एक्स्प्लोर

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची वर्षावर खलबतं; तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा, तिढा सुटला?

Mahayuti Meeting : महायुतीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी रात्री साडेचार तास बैठक पार पडली असून तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) काल रात्री उशिरापर्यंत महत्वाची बैठक पार पडली. साधारण साडेचार तास बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),  मंत्री उदय सामंत (Uday Samant), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित होते. स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाली. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा निवडून तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील बैठक दोनतासांपासून सुरूच आहेत. बैठकीत स्टँडिंग सीट तसेच, तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. तीन पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणं याचाही विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? 

जिंकून येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे, यावर विचार विनिमय केला जात असल्याचं कळतं. निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षानं टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निगडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवं. प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोल चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अनेक मुद्द्यांवर तिनही पक्षांचं एकमत 

निवडणुकीत तिन्ही पक्षांची भूमिका एकच असायला हवी. एकमेकांवरील टीका, टिपण्णी आणि चिमटे टाळा, असा सल्लाही बैठकीत सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा जागांची घोषणा सर्वात शेवटी करून नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर बैठकीत एकमत झालं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकदीनं जागा निवडून आणण्यावरही तिनही पक्षातील प्रमुख नेत्यांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

तीन पक्षाचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणांसंदर्भातही विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिंकूण येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे, यावर विचार विनिमय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षानं टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवं, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच प्रचार आणि सभांची जबाबदारी, त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पाहा व्हिडीओ : महायुतीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी रात्री साडेचार तास बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaJustice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Embed widget