एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये अजितदादांना मोठा दणका, सतीश चव्हाण शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) राजकीय घडामोडींना वेग आलाय. सतीश चव्हाण (Satish Chavan) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Satish Chavan: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सतीश चव्हाण (Satish Chavan) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चार वाजता सतीश चव्हाण पत्रकार परिषद घेणार आहेत. हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सतीश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत. ते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. थोड्याच वेळात सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.  गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आहेत. 

गंगापूर विधानसभा निवडणुकीत 2019 ला काय घडलेलं? 

गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 107193 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील  यांना 72222 मतं मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15951 मतं मिळाली होती. 

पक्षविरोधी काम केल्यामुळे सतीश चव्हाण यांना केलं होतं निलंबीत 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे इच्छुकांच्या पक्षबदलाच्या बातम्याही समोर येत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाने पक्षविरोधी काम केल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.  जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला होता. सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर टीका देखील केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असे सतीश चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी थेट पत्र लिहून आपली भूमिका जाहीर केली होती. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9  PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलंPaddy Kamble at Dhananjay Powar House : DP दादाच्या घरी जंगी पाहूणचार, पॅडीदादा ताट घेऊन का पळाला?ABP Majha Headlines : 7 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
Embed widget