एक्स्प्लोर

"मनोज जरांगेंनी गोलमेज परिषद घ्यावी आणि.." राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंवर भडकले, म्हणाले, 'आरक्षणाच्या आडून..'

निवडणूक काळात काँग्रेस नेत्यांमुळे नकारात्मकता पसरवण्यास मदत मिळाली. सामान्य जनतेची दिशाभूल आणि बुद्धिभेद याचे हे यश आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा नाही.

Radhakrushna Vikhe Patil on Manoj Jarange: जरांगे पाटलांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेसच्या बोलघेवड्या आणि उबाठाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावं. मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हणत विखे पाटलांनी जरांगे यांना चांगलच सुनावलंय.

आरक्षणाच्या मागणीआडून फडणवीसांवर टीका

राज्यात मराठा आरक्षण प्रश्न गंभीर होत चालला असताना राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पश्चिम दौरा सुरू केला असून दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान आरक्षणाच्या आडून फडणवीसांवर टीका करण्याचं थांबवा असं विखे पाटील म्हणालेत. .

महाविकास आघाडीचा भ्रमनिरास होणार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो नकारात्मक प्रचार झाला त्याला अनेक कांगोरे आहेत. गेली दोन वर्ष काँग्रेस मित्रपक्ष त्या विषयावर काम करत होते. स्थानिक नेत्यांच्या कल्पनाशक्ती पलीकडे आहे. निवडणूक काळात काँग्रेस नेत्यांमुळे नकारात्मकता पसरवण्यास मदत मिळाली. सामान्य जनतेची दिशाभूल आणि बुद्धिभेद याचे हे यश आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा नाही. जनतेला त्यांची चूक कळलेली आहे. ज्या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते वावरत आहेत त्यांचा भ्रमनिरास जनता लवकरच करेल असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंची फडणवीसांवर टीका

आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण (Maratha Reservation) घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर बोलायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. ते तुळजापुरात (Tuljapur) पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पक्षाचा सुफडा साफ करतील असे जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील मराठा खवळला आहे. त्यांच्यामध्ये  मोठी खदखद असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आहे की, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला समजून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. राज्यात जेवढे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे की मराठ्यांचे ओबीसीतील आरक्षण द्यायला पाहिजे असे जरांगे पाटील म्हणाले.  तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे, तुम्ही आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget