Maharashtra Politics : सरकारविरोधात आवाज काढताच मुंबई लॉ एजन्सीची नोटीस, सतिश आचार्य म्हणाले...
Maharashtra Politics : सरकारविरोधात आवाज काढताच कार्टुनिस्ट सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून नोटीस बजावण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Maharashtra Politics : सरकारविरोधात आवाज काढताच कार्टुनिस्ट सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती यांच्यातील संबंध आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षाबाबत काही व्यंगचित्र काढले होते. आचार्य यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, सरकारविरोधात व्यंगचित्र काढल्यानंतर आता सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची नोटीस आल्याचे बोलले जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
So happy to know that Mumbai is so peaceful with perfect law & order situation that the police are now focussing on cartoons. 🙄 pic.twitter.com/Q3Wqbcr82f
— Satish Acharya (@satishacharya) January 3, 2025
दरम्यान, नोटीस आल्यानंतर सतीश आचार्य यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. "हे जाणून खूप आनंद झालाय की मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेसह शांत आहे. त्यामुळे व्यंगचित्रावर त्यांनी लक्ष करण्यात आलंय", असं आचार्य म्हणाले आहेत.
व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हे संविधानातील मूलभूत अधिकारां मधील एक ..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2025
आता त्याचा ही गळा आवळणार…
सतीश आचार्यां बरोबर उभे राहूया pic.twitter.com/Pyj60lDx4L
आता त्याचा ही गळा आवळणार : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, लॉ इनफोर्समेंट एजन्सीने सतीश आचार्य यांना नोटीस दिलेली आहे हीच माहिती नाही. त्यांच्या काही व्यंगचित्रांवर आक्षेप घेतलेला आहे. एक काळ असा होता आर के लक्ष्मण हे इंदिरा गांधींपासून लालकृष्ण अडवणी यांच्यावर व्यंगचित्र काढायचे. बाळासाहेब ठाकरे यांची देखील व्यंगचित्रे गाजली. आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन आजही सर्वांना पाहायला मिळतो. सतीश आचार्य यांचा एकही चित्र चुकीचं नाही. वास्तववादी आहेत. सध्या इथल्या कवी मनामध्ये भय निर्माण करणे विद्रोही लोकांमध्ये भय निर्माण करणे इथल्या साहित्यिकांमध्ये भय निर्माण करणे कलाकारांमध्ये बळी निर्माण करणे. दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे काम सुरू आहे. माझ्या घरामध्ये मी पत्रकार परिषद घेत असताना समोर एक व्यक्ती रेकॉर्डिंग करत होता तो पोलीस आहे हे मला नंतर लक्षात आलं म्हणजे राजकारण्यांच्या घरामध्ये देखील पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान या सर्वांवर घाला घालण्याचे काम सरकार करत आहे. सगळीकडून भीती निर्माण करण्याचं काम सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे लोक आमच्या बाजूने आहेत. लोकांमध्ये बहिण निर्माण करण्यासाठी तुम्हाला बहुमत दिलेलं नाही. लोक सगळं सहन करतात पण प्रेशर सहन करत नाही. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हे संविधानातील मूलभूत अधिकारां मधील एक ..आता त्याचा ही गळा आवळणार…
सतीश आचार्यां बरोबर उभे राहूया
आदित्य ठाकरे म्हणाले, पूर्णपणे सत्य असलेल्या व्यंगचित्रांना आता “मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सी” कडून नोटिसा पाठवल्या जात आहेत.मला वाटले @X ला @elonmusk इतर कोणाच्याही गोपनीयता/स्वातंत्र्य/अधिकारांना पायदळी तुडवत नाही. @MumbaiPolice या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे? कोणाला त्रास देणारे काही? काही खोटे? काही अपमान?
Cartoons that are absolutely true are now being sent notices by “Mumbai Law Enforcement agencies”.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 4, 2025
I thought @X was taken over by @elonmusk to protect free speech, especially one that doesn’t trample on anyone else’s privacy/ freedom/ rights.
What’s wrong in these cartoons… https://t.co/utfFEAkqcR
इतर महत्त्वाच्या बातम्या