Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून नव्या उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Devendra Fadanvis Tweet: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अजित पवार आणि इतर आमदारांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadanvis Tweet: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथविधी घेतला आणि राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. अजित पवार यांच्या शपथविधीवर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी ट्विट करत अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. शरद पवार यांनी अजित पवारांना पाठिंबा नसल्याचं सांगत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट केलं. आधी अजित पवार त्यांच फसलेलं बंड, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील फूट, आता अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ इथपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना प्रवास केला आहे.
फडणवीसांनी ट्विट करत काय म्हटलं?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांचे अभिनंदन केले आहे. अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो !याशिवाय छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्वांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !"
2/7/23 📍राजभवन, मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 2, 2023
आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात… pic.twitter.com/sLpIXWf7yO
मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
"अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
