Dhananjay Munde: अजित दादा आता मन मोकळं कराच...; धनंजय मुंडेंची अजित पवारांना साद
Maharashtra Politics Crisis : टीका सहन केली पण कधी अजित पवार सत्य बोलले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
Maharashtra Politics Crisis : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहे. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील दमदार भाषण केले आहे. तर 'अजित दादा आता मन मोकळं कराच अशी साद मुंडेंनी अजित पवारांना घातली. तसेच अजित पवारांनी ज्या-ज्या गोष्टी शरद पवार साहेबांच्या शब्दाखातीर केल्या, त्या स्वत:च्या सावलीला देखील कळून दिल्या नाहीत. टीका सहन केली पण कधी सत्य बोलले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 'एक व्यक्ती ज्याने सर्वात जास्त अपमान सहन केला, सर्वात जास्त ज्याला मान खाली घालावी लागली, सर्वाधिक ठेचा खाव्या लागल्या असतील त्या व्यक्तीचे नाव अजित पवार आहे. राजकारणाच्या जिवनाची सुरवात ज्या देवताची हात पकडून केली, कधी शब्द मोडला नाही. आयुष्यात कितीही चांगले प्रसंग आले असतील, कितीही चांगली संधी स्वतःला मिळत असल्यास ती संधी शरद पवारांच्या शब्दावर आपल्या सहकाऱ्यासाठी सोडली. कारण एवढं मोठ मन त्यांचे असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
'अजित दादा आता मन मोकळं कराच..'
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, आज ही वेळ का येत आहेत, याचा उलगडा कधीतरी अजित दादांनी करावी. अजित पवारांनी कधीतरी आपलं मन मोकळं करावे. किती दिवस तुम्ही तुमच्या मनात तुमचे असंख्य प्रसंग, तुमचे असंख्य अपमान, तुमच्या मनात ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या सावलीला देखील तुमचा अपमान, तुमचं दुःख कळू दिले नाही. पण कधीतरी याबाबत महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागेल. काहीही झालं तर अजित दादांवर टीका केली जाते. काही घडलं तर टार्गेट अजित पवारच केले जातात. 2017,2014 आणि 19 चे उदाहरण दिले. काल परवाच्या दुपारच्या शपथविधीचे उदाहरण दिले. प्रत्येकवेळी दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहे.
माझ्या लोकांनी देखील माझ्या तोंडावर थुंकले
माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला, माझ्यावर देखील अशीच वेळ आली होती. माझ्या लोकांनी देखील माझ्या तोंडावर थुंकले होते. त्यावेळी माझी नियत साफ होती. त्या नियतिच्या पाठीमागे अजित पवार उभे राहिले. अजित पवार यांची देखील नियत साफ असून, नियत देखील तुमच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांना सकाळी उठण्याची सवय आहे. शरद पवारांनी घालून दिलेल्या आदर्शमुळे हा पक्ष आज इथे पोहचला आहे. आज इथे सर्वजण राष्ट्रवादी पक्षाचा स्वाभिमान म्हणून इथे आले आहेत. त्यामुळे हा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असेही धनंजय मुंडे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: