एक्स्प्लोर

Maharashtra Politics : संजय कोकाटेंचा माढ्यात दीड लाख शपथ पत्र वाटत अनोखा प्रचार; मतदारसंघात घरोघरी जाऊन शपथपत्र वाटली

Maharashtra Politics: मी आमदार झाल्यावर काय करणार? याची भरभरून आश्वासनं उमेदवार देत असतात. मात्र, मी आमदार झाल्यावर काय करणार नाही? याची भलीमोठी यादीच संजय कोकाटे यांनी शपथपत्रातून दिली आहे.

Maharashtra Political Updates : सोलापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतून (Shiv Sena) शरद पवार गटात (Sharad Pawar Group) प्रवेश केलेल्या संजय बाबा कोकाटे (Sanjay Baba Kokate) यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मी आमदार झाल्यावर हे करिन आणि हे करणार नाही, असा मजकूर असलेली दीड लाख शपथपत्र मतदारसंघात वाटून त्यांनी अनोख्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे. एकदा आमदार झालं की, काय करणार याबरोबर काय करणार नाही? याचं शपथपत्र देणारा मी पहिला इच्छुक उमेदवार आहे. 

मी आमदार झाल्यावर काय करणार? याची भरभरून आश्वासनं उमेदवार देत असतात. मात्र, मी आमदार झाल्यावर काय करणार नाही? याची भलीमोठी यादीच संजय कोकाटे यांनी शपथपत्रातून दिली आहे. यात मी स्वतःच्या प्रपंचासाठी आमदारकीचा उपयोग करणार नाही, मी किंवा माझे नातेवाईक ठेकेदारीचा व्यवसाय करणार नाहीत, भ्रष्ट अधिकाऱ्यांना मतदारसंघात येऊ देणार नाही, मी कोणतीही संस्था, कारखाने किंवा जनतेच्या जीवावर कोणताही व्यवसाय करणार नाही, माझ्यानंतर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला राजकारणातील किंवा सत्तेतील पद देणार नाही अथवा निवडणुकीलाही उभे करणार नाही, अशा पद्धतीचं शपथपत्र संजय कोकाटे यांनी मतदारांपर्यंत पोहोचवलं आहे. 

गेल्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून संजय बाबा कोकाटे यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 76 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यावर कोकाटे हे शिंदे सेनेसोबत राहिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यावर कोकाटे यांचे कट्टर विरोधक आमदार बबनदादा शिंदे हेही महायुतीत आल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकाटे यांनी शिंदेसेनेला सोडचिट्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेमध्ये महायुतीच्या विरोधात जोरदार प्रचार करीत माढा विधानसभा मतदारसंघातून 52515 मतांचं मताधिक्य देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी केलं होतं. माढा विधानसभा मतदारसंघावर संजय कोकाटे यांचा दावा असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शपथपत्रातून आपलं म्हणणं मतदारांपर्यंत पोचवल्याचं सांगितलं आहे. संजय कोकाटे महायुतीमधून राष्ट्रवादीत गेल्यानं महायुतीला लोकसभा निवडणुकांतही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. आता संजय कोकाटे यांनी थेट महायुतीच्या विरोधातच उमेदवारी दाखल करताना शपथपत्राद्वारे मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केल्यानं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Embed widget