(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : आधी भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधीसाधू दिसतात; उद्धव ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray : गौरव यात्रा काढत आहात, पण स्वा. सावरकर याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यची हिंमत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Uddhav Thackeray Speech In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीची एकत्रित सभा होत असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेत असाल तर भारतीय जनतेचा अपमान आहे. तर तुमचे हिंदुत्व आम्ही मानणार नाही. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे आता संधीसाधू दिसतात. गौरव यात्रा काढत आहात, पण स्वा. सावरकर याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यची हिंमत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही तुम्हाला मानूत. तसेच वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातुन पोलाद गोळा केले. पण त्या पोलंदाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघडीचं सरकार ज्या पद्धतीने पाडले ते मंजूर आहे का?, आम्ही तीनही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलो. पण सत्ता गेल्यावर अधिक घट्ट पणे एकत्र आलो आहे. अमित शहा यांनी माझ्यावर आरोप केले. पण मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही असे नाही. आम्ही सत्तेसाठी काँगेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणतात. मग तुम्हे मिंदेचे काय चाटले, बिहारमध्ये नितीशकुमार यांचे काय चाटले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
उद्धव ठाकरे उभा राहताच घोषणाबाजी...
छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे येताच आणि भाषणाला उभे राहताच सभेमधील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'उद्धव ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर याचवेळी शिंदे गटाच्या विरोधात देखील अनेकांनी घोषणाबाजी केली.
सरकारविरोधात घोषणाबाजी...
महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात एकत्रित सभा होत आहे. यावेळी ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी सभेसाठी आलेल्या लोकांमध्ये सरकारविरोधात मोठा रोष पाहायला मिळाला. यावेळी अनेकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळाले. तसेच या सभेत पन्नास खोक एकदम ओक्के, या गद्दारांचा करायचं काय अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :