एक्स्प्लोर

Maharashtra Nagarparishad Election: राज्यातील 'या' 10 नगरपरिषदांमध्ये हायव्होल्टेज लढाई, निकाल गेमचेंजर ठरणार, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Nagarparishad Election: मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तर विदर्भातील काही लक्षवेधी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Nagarparishad: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Election) आज (मंगळवारी, ता २) मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल, या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे. तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तर विदर्भातील काही लक्षवेधी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Maharashtra Nagarparishad Election:  विदर्भ लक्षवेधी लढती

कामठी नगराध्यक्ष पद
भाजप उमेदवार अजय अग्रवाल
अजय कदम, बहुजन रिपब्लिकन एकता मंच उमेदवार
शकूर नागानी, काँग्रेस उमेदवार

सावनेर नगरपरिषद, नगराध्यक्ष उमेदवार
संजना मंगळे, भाजप
सीमा चाफेकर, काँग्रेस

रामटेक नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
ज्योती कोल्हेपरा, भाजप
बिकेंद्र महाजन, शिवसेना शिंदे
रमेश कारेमोरे, काँग्रेस

काटोल नगरपरिषद नगराध्यक्ष पद उमेदवार
अर्चना देशमुख, शेकाप (राष्ट्रवादी शरद पवार गट पाठिंबा)
कल्पना उमप, भाजप

कळमेश्वर नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
अविनाश माकोडे, भाजप
ज्योत्सना मंडपे, काँग्रेस

उमरेड नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार
शालिनी सोनटक्के, शिवसेना शिंदे गट
सुरेखा रेवतकर, काँग्रेस
प्राजक्ता आदमने, भाजप

पुसद नगरपरिषद
मोहिनी नाईक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
निखिल चिद्दरवार- भाजप
महंमद नदीम अब्दुल रशीद-काँग्रेस
अनिल ठाकुर- शिवसेना उबाठा

भंडारा 
शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर या शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेस (जयश्री बोरकर), भाजप (मधुरा मदनकर), अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (सुषमा साखरकर) चे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बुलढाणा 
आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड x काँग्रेसच्या लक्ष्मी काकस x भाजपाच्या अर्पिताताई विजयराज शिंदे

Maharashtra Nagarparishad Election: उत्तर महाराष्ट्र लक्षवेधी लढती

नाशिक जिल्हा

त्रंबकेश्वर नगरपरिषद
आगामी सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर मध्ये भरत असल्यानं त्रंबकेश्वर नगर परिषदेला महत्त्व. भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र. हजरो कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, कुंभमेळा निमित्ताने त्रंबकेश्वर चे ब्रँडिंग जगाच्या पाठीवर होणार यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी जोर लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ त्रंबकेश्वर पासून केला तर एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या दिवशी सभा घेत विकास कामाचे आश्वासन दिले

नगराध्यक्षपदाचे उमेदवार
कैलास घुले (भाजप)
सुरेश गंगापुरे (राष्ट्रवादी अजि.)
त्रिवेणी तुंगार- सोनवणे (शिवसेना)
दिलीप पवार (माविआ)

सिन्नर नगरपरिषद
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला. कोकाटे याना भाजप ने दिले कडवे आव्हान, भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत

हेमंत वाजे (भाजप)
प्रमोद चोथवे (माविआ)
विठ्ठलराजे उगले (राष्ट्रवादी अजि.)
नामदेव लोंढे ( उबाठा)

येवला नगरपरिषद
येवला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) व भाजप युती असून राजेंद्र लोणारी हे त्यांचे उमेदवार आहेत तर शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) अशी युती होऊन रुपेश दराडे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे..या निवडणुकीत आमदार दराडे बंधूंनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध या निवडणुकीच्या माध्यमातून दंड थोपटले आहे..तर भुजबळ कुटुंबियांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली..संपूर्ण भुजबळ कुटुंबच येवल्यात प्रचाराला मैदानात उतरले आहे.. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली तर मंत्री छगन भुजबळ यांनी तब्येत बरी नसतांना हॉस्पिटलमधून ऑनलाईन सभा घेत येवलेकरांशी संवाद साधत भावनिक साद घातली...त्यामुळे येवल्यातील निवडणूक ही इंटरेस्टेड झाली आहे...

राजेंद्र लोणारी (भाजप-राष्ट्रवादी)
रुपेश दराडे (शिवसेना शिंदे - राष्ट्रवादी शप)
जळगांव जिल्हा

मुक्ताईनगर नगरपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीं खडसे यांच्यां बालेकिल्लातच राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार नाही. शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात लढाई असून खडसे यांचाभाजप ला छुपा पाठींबा असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुक्ताई नगर शहरात ताकद नसल्याचे स्पष्टीकरण देत एकनाथ खडसे यांनी आयत्यावेळी नगर पंचायत निवडणुकी साठी उमेदवार न दिल्याने महा विकास आघाडी होऊ शकली नाही त्यामुळे शिंदे गटाचे आ चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील आणि भाजपा च्या भावना महाजन यांच्या मध्ये या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एकूण सतरा जागा साठी ही निवडणूक होत असून शिंदे गट आणि भाजप हे सगळ्या सतरा जागा लढवित आहेत. तर काँग्रेस चार आणि अजित दादा पवार यांच्या तीन अशा एकूण सात जागा इतर पक्ष लढवित आहेत. खडसे यांनी आपल्या सुनबाई रक्षा खडसे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार उभा केला नसल्याचा आरोप केला जात आहे. खडसे मात्र या विषयावर मौन बाळगून आहे एन वेळी खडसे यांनी दगा दिल्याने, महा विकास आघाडी सगळ्या जागी आपले उमेदवार देऊ शकले,नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे

भावना ललित महाजन (भाजप)
संजनाताई चंद्रकांत पाटील (शिवसेना)

पाचोरा नगरपरिषद
जळगाव जिल्ह्यात पाचोरा नगर परिषदेची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे
भाजप ने नेहमीच आपल्याशी दगाबाजी केल्याने आपण,भाजपा सोबत युती करू शकत नसल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या आ किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची राज्यात पहिल्यांदा घोषणा केली होती. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील या शिंदे गटाच्या नगरराध्यक पदाच्या उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात भाजपा च्या सुचेता वाघ या उभ्या आहेत मात्र या ठिकाणी किशोर पाटील यांच्या भगिनी ही भाजपा सोबत असल्याने,त्या आपले बंधू आ किशोर पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचं चित्र आहे

सुनीता किशोर पाटील (शिवसेना शिंदे)
सुचेता दिलीप वाघ (भाजप)

अहिल्यानागर जिल्हा

संगमनेर नगरपरिषद
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर ची निवडणूक इंटरेस्टिंग आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुक तांबे थोरात यांच्या विरोधात विखे आणि खताळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे... विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसमधून निलंबित असलेले सत्यजित तांबे यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहे.. तर दुसरीकडे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भावजई निवडणूक रिंगणात आहे... विधानसभा निवडणुकीतील पराभवा नंतर बाळासाहेब थोरात सक्रीय असून मतदारांच्या भूमिकेकडे सेवांचे लक्ष लागले आहे.. चाळीस वर्षानंतर विधानसभेत झालेले परिवर्तन पुन्हा पालिकेत होणार का हे पाहणं महत्त्वच आहे...
- नगराध्यक्ष उमेदवार --- मैथिली सत्यजित तांबे ( विद्यमान आमदार सत्यजित यांच्या पत्नी )
- भाजप सेना युती नगराध्यक्ष उमेदवार- सुवर्णा संदीप खताळ.. ( विद्यमान सेना आमदार अमोल खताळ यांच्या भावजई )

जामखेड नगरपरिषद
नगर (दक्षिण) जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद निवडणूक ही रंगतदार होणार आहे
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे , राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवारांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे...
या नगरपरिषद निवडणुकीत सर्वच पक्ष वेगळे लढत आहेत...
भाजप , शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस , आणि राष्ट्रवादी Sp ने येथे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले आहेत...
भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतले तर शिवसेना शिंदे गटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली...
रोहित पवारांना जामखेडमध्ये तळ ठोकून बसावं लागलं...

प्रांजल अमित चिंतामणी (भाजप)
संध्या शहाजी राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार)
पायलताई आकाश बाफना (शिवसेना शिंदे)
सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget