Maharashtra Municipal Corporation Election LIVE: राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; कोणाची लागली वर्णी, तर कोणाचा पत्ता कट?
Maharashtra Mahanagarpalika Eletion LIVE: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह, सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Mahanagarpalika Eletion LIVE: राज्यात महानगरपालिकांचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. काल निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. काल पक्षानं ज्यांना एबी फॉर्म दिलेत, त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेत. तर, नाराज झालेल्यांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरले, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. दरम्यान, या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने वेळेत एबी फॉर्म भरले नसल्याची तक्रार खासदार प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटानं केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढतोय. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल आणि आज एबी फॉर्म वाटप करण्यात आलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत 163 जागा लढत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं आणखी एका पदाधिकाऱ्यानं बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाकरेंची शिवसेना बंडखोरी करणाऱ्यांचं समाधान कसं करणार याकडे लक्ष लागलं आहे.
Nashik Mahanagarpalika Eletion LIVE: नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Nashik Mahanagarpalika Eletion LIVE: नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
- ठाकरेंच्या सेनेतून भाजप मध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची खेळी
- विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांना एकाच घरात तीन उमेदवाऱ्या
- सुधाकर बडगुजर , मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांच्या अर्जा सोबत भाजपचा ab फॉर्म
- हर्षा बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही पक्षाने दिला होता एबी फॉर्म
- मात्र हर्षा बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज अगोदर आल्याने तो वैद्य ठरण्याची शक्यता
Mahanagarpalika Eletion LIVE: सुनील प्रभूंच्या मतदार संघातील युवासेना सहसचिवांकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मतदार संघातील युवासेना सहसचिव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला..
मालाड मध्ये प्रभाग क्रमांक 43 हा शिवसेना ठाकरे गटाचा बाल किल्ला होता
मात्र शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीमध्ये प्रभाग क्र 43 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गेल्यामुळे समृद्ध शिर्के हे नाराज होते
प्रभाग ४३ मधून निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडून तयारीच्या देण्यात आला होता आदेश
मात्र हा प्रभाग ४३ तुतारीला गेल्यामुळे समृद्ध शिर्के बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
यामुळे या प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिलेदारा विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल....
प्रभाग क्रमांक 43 मध्ये लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत या वार्डामधून लीड मिळाला होता
ठाकरेंचं बाल किल्लात मात्र तुतारीला प्रभाग गेल्यामुळे इथले सर्व शिवसैनिक नाराज होते त्यामुळे बंडखोरी करत शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आह
शिर्के यांचा कामावर इथली जनता त्यांना निवडून देईल असा विश्वास समृद्ध शिर्के यांनी व्यक्त केली आहे...























