Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील. या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.
भंडाऱ्यात तीन औषध विक्रेत्याकडून जप्त केला बॅन असलेली कप सिरप
मध्य प्रदेशात उत्पादित करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्रातही मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात कप सिरप चा पुरवठा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भंडारा औषध व अन्न प्रशासन विभागाने भंडाऱ्यातील औषध विक्रेत्या दुकानात तपासणी केली असता तीन औषध विक्रेत्यांकडे कप सिरप आढळून आलेत. तीन दुकानात आढळून आलेला औषध साठा भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. हे औषध विक्रेते डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कप सिरप विक्री करीत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात ची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यातील कोर्टाच्या नव्या इमारतीवरून उडी मारुन एका वयस्कर नागरिकांची आत्महत्या
पुण्यातील कोर्टाच्या नव्या इमारतीवरून उडी मारुन एका वयस्कर नागरिकांची आत्महत्या
चौथ्या मजल्यावरून थेट मारली उडी
नामदेव जाधव अस आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच नाव
आत्महत्येचा कारण अस्पस्ट
पोलीस घटनास्थळी दाखल


















