Maharashtra Guardian Ministers List: तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?; रायगडमध्ये शिवसेनेचा दावा, अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Guardian Ministers List: पुणे,रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत.
Maharashtra Guardian Ministers List: मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) देखील पाहायला मिळतेय. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसतंय. पुणे,रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत.
पुण्यात पालकमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) की चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)...तसेच रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांच्याकडे की आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडे याचा सस्पेन्स चांगलाच वाढलाय. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार आहेत, तर अजित पवार गटाचा एकच आमदार आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावरुन दावा ठोकला आहे. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे. सातारा जिल्ह्यातून तर चार चार मंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाकडे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार-
काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले.
रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार; गोगावले यांचा विश्वास-
महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडताच शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे . मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कलंबोळी ते महाड मार्गे भव्य रॅली निघाली आहे. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रस्सी खेच याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने मला पालकमंत्री पद देतील असे गोगावले म्हणाले.
पालकमंत्रिपदावरून कुठे संघर्ष?
जिल्हा : ठाणे
एकनाथ शिंदे, शिवसेना
गणेश नाईक, भाजप
----------------------------
जिल्हा :जळगाव
गुलाबराव पाटील, शिवसेना
संजय सावकारे, भाजप
----------------------------
जिल्हा : बीड
पंकजा मुंडे, भाजप
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : यवतमाळ
अशोक उईके, भाजप
संजय राठोड, शिवसेना
इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : सातारा
शंभुराज देसाई, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
जयकुमार गोरे, भाजप
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
------------------------
जिल्हा :कोल्हापूर
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश अबिटकर, शिवसेना