Maharashtra Goverment Cabinet Decision: जन आरोग्य योजनेसाठी राखीव निधी, वसई-विरार मनपाला रुग्णालयासाठी जमीन, अकोला-सोलापूरसाठी मोठा निर्णय, कॅबिनेटचे 8 निर्णय
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या (23 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय- (Maharashtra Goverment Cabinet Decision)
1. आरोग्य विभाग- शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी.
2. परिवहन विभाग- नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या 193.15 कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी 491 कोटी 5 लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
3. महसूल विभाग- अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा. मौजे अकोला येथील 24 हजार 579.82 चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी.
4. महसूल विभाग- सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.
5. महसूल विभाग- वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे ( ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.
6. महसूल विभाग- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता.जि. नाशिक ) येथील 1055.25 चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.
7. गृह विभाग- मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश.
8. गृहनिर्माण विभाग- मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (एसव्हीपी नगर) येथे म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार. याठिकाणच्या 122 संस्थांच्या, तसेच 307 वैयक्तिक भुखंडावरील 4 हजार 973 सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव.



















