Eknath Shinde: शपथविधीपूर्वी शिवसेना मंत्र्यांची बैठक, एकनाथ शिंदेंनी लिहून घेतलं शपथपत्र, विषय काय?
Maharashtra Cabinet Expansion : शपथविधीसाठी काहीच वेळ शिल्लक असताना देवगिरी बंगल्यावर एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या संभाव्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूर: महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही वेळेमध्ये पार पडणार आहे. अशातच घडामोडींना वेळ आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवगिरी बंगल्यावर आपल्या आमदारांसोबत बैठक सुरू आहे. शपथविधीसाठी काहीच वेळ शिल्लक असताना देवगिरी बंगल्यावर एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या संभाव्य मंत्र्यांसोबत (Maharashtra Cabinet Expansion) बैठक घेऊन चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. देवगिरी बंगल्यावर शिवसेनेची खातेवाटप व संदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
शिवसेनेचे आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांची बैठक सुरू आहे. शपथविधीच्या ठिकाणी येण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत बैठक घेत आहेत. खातेवाटपाच्या संदर्भात ही बैठक असल्याची माहिती आहे. शपथविधी झाल्यानंतर आता खाते वाटपाच्या चर्चांना जोर येणार आहे.(Maharashtra Cabinet Expansion)
शिवसेनेचे आमदार हॉटेलवरून देवगिरीकडे जात असताना आमदारांनी सांगितलं होतं की, मंत्रीपदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ घेण्याच्या आधी एक बैठक उपमुख्यमंत्री एका शिंदे यांनी आयोजित केली आहे. त्यानुसार, ही बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये कोणाला कोणतं खातं जाईल या संदर्भातील महत्त्वाचे चर्चा होण्याची शक्यता आहे. खातेवाटप देखील याचं बैठकीत होण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या आधी कोण कॅबिनेट मंत्री असेल कोण राज्यमंत्री असेल ही माहिती एकनाथ शिंदे आमदारांना देतील, त्याचबरोबर नवीन मंत्र्यांसोबत ते चर्चा करतील अशी माहिती आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
गृहनिर्माण पर्यटन शालेय शिक्षण किंवा उद्योग खातं अशी अनेक महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळाल्याची माहिती असल्याची माहिती आहे. या खात्यांचं वाटप झालेलं नव्हतं, त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळणार हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे एकूण बारा मंत्रीपद आहेत. मात्र आज केवळ 11 आमदार शपथ घेणार आहेत, त्याचबरोबर पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत, या नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात सुरू आहे, थोड्याच वेळात हे नेते राजभवनात दाखल होतील, कोणाला कोणती खाती मिळणार याबाबतची मोठी खलबतं सध्या एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यावरती सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
अडीच वर्षच मंत्रिपद देण्यात येणार?
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही जुने चेहरे आहेत, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात काही बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे नाराजी देखील दिसून येत आहे. अनेक दिग्गजांना नारळ देण्यात आला आहे. त्याचे पडसाद देखील उमटताना दिसत आहेत. पण त्यापूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री पदाचा एक फॉर्म्युला सांगितला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षच मंत्रिपद देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार असल्याची माहिती आहे. शिंदेंच्या झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याची माहिती आहे. आज शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना पूर्वकल्पना देऊन ठेवली असल्याची माहिती आहे.