Aditi Tatkare: 'मी आदिती...', लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवलेल्या आदिती तटकरेंवर पुन्हा मोठी जबाबदारी? मंत्रीपदाची घेतली शपथ
Maharashtra Cabinet expansion: 2024 च्या निवडणुकीवेळी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या चालवणारी महिला मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील 2019 च्या सरकारमध्ये दोनवेळा राज्यात सत्ताबदल झाला, त्या काळात एक तरूण आमदार आणि मंत्री म्हणून ज्यांची ओळख होती. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासह काही आमदार, खासदारांनी पुन्हा सत्तेत जाणं पसंत केलं. त्यावेळी देखील मंत्रीमंडळात त्या महिला आमदाराला स्थान मिळालं, त्यानंतर आता देखील 2024 च्या निवडणुकीवेळी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या चालवणारी महिला मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मोलाचं स्थान देण्यात येत आहे. आज त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) या शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या. त्यानंतर आता राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं, त्यानंतर आज (मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये पुन्हा एकदा महिला आमदाराचा समावेश करण्यात आला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे.
जाणून घेऊया आदिती तटकरे यांची कारकिर्द
आदिती वरदा सुनील तटकरे
राहणार -सुतारवाडी, ता रोहा, जि रायगड
आदिती तटकरे यांनी शरद पवार यांना पाहूनच राजकीय कारकिर्दीत येणं पसंद केलं. शरद पवार हे त्यांचे राजकीय रोल मॉडेल आहेत. आदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यांचं वय अवघे 34 वर्ष आहे. त्या महाराष्ट्रातील तरुण राजकारणी पैकी एक आहेत. आदिती तटकरे यांचं शिक्षण एम ए पूर्ण आहे. रायगडच्या रोहा येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
2007 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांचा पराभव केला तेव्हा आदिती तटकरे या त्यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत्या.
2011- 12 मध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत युवती काँग्रेस वाढवायला तरुनींना राजकारणात येण्याचं आवाहन केल. त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये सहभाग.
2012 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस कोकण विभाग संघटिका म्हणून कार्यरत होत्या.
23 फेब्रुवारी 2017 मध्ये रोजी त्यांनी पहिल्यांदा रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली आणि त्या या निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाल्या.
21मार्च 2017 रोजी त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत... 2019 पर्यंत त्यांनी हे अध्यक्षा म्हणून कामकाज पाहिलं.
2019 मध्ये त्यांनी श्रीवर्धन मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधुन पहिल्यांदा निवडणूक लढवली.
निवडून येताच उद्धव ठाकरे यांच्या सरकार मध्ये उद्योग, खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन,, क्रीडा व युवक कल्याण राजशिष्टचार, माहिती व जनसंपर्क विभागाच्या मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं.
2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचं अडीच वर्षानंतर सरकार पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीक काँग्रेससोबत त्या शिंदेच्या सरकारमध्ये सामील झाल्या, तिथे त्यांची राज्याचा महिला व बालविकास मंत्री म्हणून वर्णी लागली.
या सरकारमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना व्यवस्थित रित्या चालवली. ही योजना 2024 मधील विधानसभा महायुतीला जिंकण्यास मदतशील ठरली.