एक्स्प्लोर

मतदानाची वाढलेली आकडेवारी संशयास्पद, सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान हा संशोधनाचा विषय : बाळासाहेब थोरात

मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीत अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झालं हा संशोधनाचा विषय असल्याचे थोरात म्हणाले. 

Balasaheb Thorat : महाराष्ट्र म्हणून आम्ही एकमताने निवडणूक लढवली आहे.आमचे पक्षांतर्गत कोणतेही वाद नव्हते असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं. कुठलं धोरण ठरवायचं त्यावर आजच्या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. तसेच निवडणुकीत भाजपने वापरलेल्या गोष्टींवर देखील चर्चा झाली. मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीत अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे थोरात म्हणाले. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झालं हा संशोधनाचा विषय असल्याचे थोरात म्हणाले. 

EVM बाबत निवेदन रात्री येईल. मतदानाची आकडेवारी वाढली त्यात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. त्या आम्ही निदर्शनाला आणून दिल्या आहेत. त्यावर AICC विचार करत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झाल हा संशोधनाचा विषय आहे. बंटी शेळके यांच्या आरोपावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. असा आरोप करन चुकीचं आहे. हा आरोप योग्य नसल्याचे थोरात म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून  EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत आहेत. तर विरोधक EVM मध्ये गैरप्रकार झाल्याचे सांगत आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी देखील केली आहे. अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं या मुद्यावरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

नवी दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक

आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा देखील झाली. CWC बैठकीत केवळ ईव्हीएमवरच (EVM) नव्हे तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे. आज सकाळी काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी, नाना पटोले, रमेश चेन्निथला आणि मुकुल वासनिक यांनी निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाबाबत एक पत्र लिहिले आहे. यावर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आम्ही आमचे काम करत आहोत, आमचा धर्म पूर्ण करत आहोत, पण निवडणूक आयोगानेही आपले कर्तव्य बजावले पाहिजे अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्या आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. याबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले, श्रीकांत भारतीयांचा राऊतांना टोला, म्हणाले, EVM चे आरोप म्हणजे रडीचा डाव

महत्त्वाच्या बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, पण रायगडचं पालकमंत्रीपद कधी? मंत्री भरत गोगावलेंनी थेटच सांगितलं...
ध्वजारोहणाचा मान मिळाला, पण रायगडचं पालकमंत्रीपद कधी? मंत्री भरत गोगावलेंनी थेटच सांगितलं...
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget