पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार, वाचा सर्व आमदारांची एका क्लिकवर
26 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अगोदर निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Vidhan Sabha Election 2024) अद्याप घोषणा झालेली नाही.केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे आजच निवडणुका घोषित होऊन राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे.
26 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अगोदर निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर दिवाळी, छटपूजेनंतर लगेचच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे... दरम्यान राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) सरकार कोसळणं, शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) साथीनं महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवाळी, छटपूजेनंतर लगेचच निवडणुका होण्याची शक्यता
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. पण, यंदाच्या विधानसभेत खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. 26 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अगोदर निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर दिवाळी, छटपूजेनंतर लगेचच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
पुणे आमदारांची संख्या : 36 (Mumbai MLA List)
एकूण 21 मतदारसंघ
भाजप -9
1. शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे
2. कोथरूड चंद्रकांत पाटील
3. पर्वती- माधुरी मिसाळ
4. खडकवासला - भीमराव तापकिर
5. पुणे कॅन्टोन्मेंट (SC) - सुनील कांबळे
6. चिंचवड- अश्वविनी जगताप
7. दौंड - राहुल कुल
8. भोसरी- महेश लांडगे
9. मावळ - बाळा भेगडे
अजित पवार राष्ट्रवादी-8
10. वडगाव शेरी - सुनील टिंगरे,
11. आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
12. इंदापूर- दत्ता मामा भरणे
13. खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
14. जुन्नर - अतुल बेनके
15. पिंपरी -अण्णा बन्सोडे
16. बारामती : अजित पवार
17. हडपसर - चेतन तुपे
शरद पवार राष्ट्रवादी- 1
18. शिरूर- अशोक पवार, शरद पवार राष्ट्रवादी
काँग्रेस -3
19. कसबा पेठ - रवींद्र धंगेकर
20. पुरंदर - संजय जगताप
21. भोर-वेल्हा-मुळशी - संग्राम थोपटे
कोल्हापूर जिल्हा
एकूण 10 विधानसभा मतदारसंघ
काँग्रेस - 4 आमदार
1. कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील
2. कोल्हापूर उत्तर- जयश्री जाधव
3. करवीर- पी एन पाटील( दिवंगत )
4. हातकणंगले- राजू बाबा आवळे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 2
1 कागल- हसन मुश्रीफ
2 चंदगड- राजेश पाटील
शिवसेना शिंदे गट - 1
1. राधानगरी- भुदरगड- प्रकाश आबिटकर
अपक्ष आमदार - 3
1. विनय कोरे, शाहूवाडी
2. प्रकाश आवाडे, इचलकरंजी
3. राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ
सातारा जिल्हा
एकूण 8 विधानसभा मतदारसंघ
1. सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
2. वाई- मकरंद पाटील - अजित पवार
3. फलटण- दिपक चव्हाण - शरद पवार
4. माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
5. कोरेगाव- महेश शिंदे- शिंदे गट
6. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील - शरद पवार
7. कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
8. पाटण - शंभुराजे देसाई - शिंदे गट
सोलापूर जिल्हा
एकूण 11 विधानसभा मतदारसंघ
1) सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख, भाजप
2) सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे, काँग्रेस
3) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख, भाजप
4) बार्शी - राजेंद्र राऊत, अपक्ष (भाजप पुरस्कृत)
5) मोहोळ - यशवंत माने, राष्ट्रवादी अजित पवार
6) माढा - बबनदराव शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार
7) करमाळा - संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार
8) पंढरपूर-मंगळवेढा - समाधान अवताडे, भाजप
10) माळशिरस - राम सातपुते, भाजप
11) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी, भाजप
सांगली जिल्हा एकूण 8 विधानसभा (विद्यमान आमदार आणि पक्ष)
- मिरज विधानसभा - सुरेश खाडे (भाजप)
- सांगली विधानसभा - सुधीर गाडगीळ (भाजप)
- इस्लामपूर विधानसभा - जयंत पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार)
- शिराळा विधानसभा - मानसिंग नाईक (राष्ट्रवादी - शरद पवार)
- पलूस कडेगाव विधानसभा - डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
- खानापूर विधानसभा - अनिल बाबर (शिवसेना) - निधन
- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार)
- जत विधानसभा - विक्रम सावंत (काँग्रेस)
हे ही वाचा :