एक्स्प्लोर

Madha LokSabha : मोठी बातमी : माढा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटणार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शुभारंभ

Lok Sabha Election 2024 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ माळशिरसमधून फुटणार असल्याची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे.

माढा, सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फोडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला जाणार आहे. याची माहिती खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी दिली आहे. मंगळवारी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांची भेट झाल्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे. 

माढा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटणार

माळशिरस (Malshiras) हा मोहिते पाटील (Patil Madha) यांचा तालुका असून अजूनही मोहिते पाटील (Mohite Patil Madha) गटाकडून माघार घेण्याची कोणतीही चर्चा दिसत नाहीत. गेल्या चार दिवसापासून त्यांनी सुरु केलेला प्रचार थंडावल्याचे चित्र असले तरी, आजही कार्यकर्ते तुतारी हाती घेण्याबाबत आग्रही आहेत. असे असताना महायुती पश्चिम महाराष्ट्राचा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस (Malshiras) येथून फोडण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महायुतीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 

1 एप्रिलला माळशिरसमधून सुरुवात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत हे नीरानरसिंहपूर येथे असून प्रत्येक निवडणुकीपूर्वी ते आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत असतात. यंदाही माळशिरस येथील प्रचाराचा नारळ फोडल्यावर फडणवीस हे कुलदैवताचे दर्शनाला जाणार आहेत. अजूनही महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटला नसला तरी येत्या दोन दिवसात सर्व उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयन महाराज हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचेही निश्चित  झाल्याची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या बहुतांश जागेवरील निवडणूक (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यात होत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , रिपाई नेते रामदास आठवले , सदाभाऊ खोत , महादेव जानकर यांच्यासह सर्वच महायुतीमधील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत . यापूर्वी मोहिते पाटील यांची नाराजी दूर होईल असा विश्वास भाजपला आहे म्हणूनच हा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडला जाणार आहे . 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी! ठाकरे-पवारांचे शिलेदार कोण? शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची उद्या घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं,  विमानतळाचे सगळे रनवे बंदMumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP MajhaMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Embed widget