एक्स्प्लोर

Sangli Loksabha: विश्वजीत कदम-विशाल पाटलांच्या दिल्लीवारीनंतर चक्रं फिरली, ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआची तातडीची बैठक, सांगलीचा तिढा सुटणार?

Sangli News: सांगली लोकसभेचा वाद चिघळला, ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे काय करणार? शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत, असेही विश्वजीत कदम यांनी म्हटले होते.

मुंबई: सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत नाराजी वातावरण आहे. सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी उमेदवारी जवळपास निश्चित होती. मात्र, ठाकरेंनी परस्पर आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने पेच निर्माण झाला होता. ठाकरे गटाकडून बुधवारी प्रसिद्ध केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीतही चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचे नाव होते. त्यामुळे विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठली होती. य दोघांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सांगली मतदारसंघाबाबत मविआच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघाबाबतची आपली बाजू हायकमांडसमोर मांडल्यानंतर आपण याबाबत शिवसेना नेत्यांशी बोलू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या भेटीनंतर अवघ्या काही तासांमध्ये मुंबईत महाविकास आघाडीची बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना माघार घ्यायला सांगावी आणि विशाल पाटील यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा, असा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडला जाऊ शकतो. यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. याशिवाय, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मुंबई या मतदारसंघाबाबतही मविआ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. 

सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम इरेला पेटले

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम हे आमच्या विमानाचे पायलट आहेत, ते नेतील तिकडे आम्ही जाऊ, असे म्हटले होते. हे वक्तव्य करुन विशाल पाटील यांनी एकप्रकारे आपल्याला विश्वजीत कदम यांचे नेतृत्त्व मान्य असल्याचे संकेत दिले होते. आता सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा सांगितल्यानंतर विश्वजीत कदम एखाद्या नेत्याप्रमाणेच आपल्या सहकाऱ्याच्या मदतीला धावून आले आहेत. विश्वजीत कदम हे बुधवारी विशाल पाटील यांना घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांनी दिल्लीत मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेऊन सांगली लोकसभेबाबत आपली भूमिका मांडली. सांगली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला हवा आहे, याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ही जागा कशाप्रकारे काँग्रेसची आहे आणि विशाल पाटील यांनाच उमेदवारी का मिळाली पाहिजे, यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्लीत हायकमांडसमोर बाजू मांडली. 

आणखी वाचा

काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Thane Full Speech :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल,व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंवर टीकाNaresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget