Loksabha Election 2024 : कुठे नणंद -भावजय, कुठे पती-पत्नी तर कुठे भावा बहिणीत लढत, अनेक जागांवर कौटुंबिक लढाई
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे.
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रापासून अनेक राज्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय. मात्र, 2024 लोकसभा निवडणूक वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. कारण या निवडणुकीत अनेक जागांवर कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊयात कोठे कोठे होणार कुटुंबात होणार लढत?
पश्चिम बंगालमध्ये विभक्त दाम्पत्य आमने-सामने
पश्चिम बंगलामधील विष्णूपूर लोकसभा मतदारसंघातून विभक्त झालेले पत्नी-पत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढताना दिसणार आहेत. भाजपने खासदार सौमित्रा खान यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजाता मंडल यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे विष्णूपूरच्या जागेवर कौंटुबिक सामना पाहायला मिळणार आहे.
आंध्रप्रदेशात चुलत भावा बहिणीमध्ये चुरस
आंध्रप्रदेशातील एका जागेवर चुलत भावा बहिणीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष इथे आमने सामने आले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांना तिकिट दिले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांची बहिण निवडणूक लढत आहे.
ओडिशात सख्ख्या भावांमध्ये सामना
ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या घोषणाही केल्या आहेत. ओडिसातील चिकिटी विधानसभेच्या जागेवरुन दोन सख्ख्या भावांमध्ये सामना रंगणार आहे. काँग्रेसने रवींद्रनाथ सामंतराय यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात चिंतामणी सामंतराय निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्रात नणंद - भावजयमध्ये लढत
महाराष्ट्रात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांचे आव्हान असणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा संधी देत मैदानात उतरवले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या