Loksabha 2024: माढा, सोलापूर, बारामतीसह तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघ, प्रचारात 'हे' मुद्दे ठरले लक्षवेधी
या 11 मतदारसंघातील मुद्द्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या तेथील प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, 11 लोकसभा मतदारसंघात चर्चेत आणि केंद्रस्थानी असलेले हे मुद्दे आहेत.
मुंबई :लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) 11 मतदारसंघात निवडणूक होत असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. गेल्या महिनाभरापासून या मतदारसंघात उमेदवारांनी गावोगावी जाऊन मतदारांना आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तर, दिग्गज नेत्यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक मतदारसंघात सभा घेऊन मतदारांना विकासाचे आणि देशाच्या निवडणुकीचे (Loksabha Election) महत्त्व समजावण्याचा प्रयत्न केलाय. तर, देशातील लोकशाही धोक्यात असल्याने लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचंही काही नेत्यांनी आपल्या जाहीर सभेतून म्हटलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश मतदारसंघात जाहीर सभा घेऊन मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. तर, राहुल गांधीही पुण्यासह इतर जिल्ह्यात सभा घेऊन जनतेसमोर आले होते.
एकंदरीत तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात प्रचाराचे आणि यंदाच्या निवडणुकीचे मुद्दे काही समप्रमाणात तर काही स्थानिक समस्यांवरुन होते. या 11 मतदारसंघातील मुद्द्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या तेथील प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, 11 लोकसभा मतदारसंघात चर्चेत आणि केंद्रस्थानी असलेले हे मुद्दे आहेत.
1. रायगड
महाविकास आघाडीचे प्रचार मुद्दे- सदाचार विरूद्ध भ्रष्टाचाराची लढाई, अब की बार भाजप तडीपार, सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती, आमची लढाई हुकूमशाही विरूद्ध लोकशाहीची
महायुतीचे प्रचार मुद्दे- केमिकल विरहित कारखाने, रेल्वेचे नेटवर्क वाढविणे, संविधानाला कोणत्याही प्रकारे हात न लावणे. कोकणातील औद्योगिकनात विशेष भर देणे
वंचीत बहुजन आघाडी प्रचार मुद्दे -बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, मुंबई गोवा महामार्गाचा विकास, महिला सक्षमीकरण, उद्योग धंदे
2. बारामती
पवारांच्याच घरात दोन गट झाल्याने यंदाची निवडणूक वेगळी आहे
सुप्रिया सुळे संविधान बचाव, शेतकरी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या प्रश्नावरती लढत आहेत
तर दुसरीकडे सुनिता पवार विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहेत
बारामती सारखा विकास मतदार संघातील इतर विधानसभा असलेल्या भागात करणार असल्याचा अजित पवार सातत्याने सांगतात
विकासासोबतच विचारही महत्त्वाचा असल्याचं सुप्रिया सुळे सांगतात
पवारांच्या कुटुंबाभोवती ही निवडणूक फिरत आहे
3. धाराशीव-
7 टीएमसी पाणी पुरवठा योजना
धाराशिव चे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय
शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना
सोलापूर- तुळजापुर- धाराशिव रेल्वे मार्ग
तुळजापूरचा विकास आराखडा
1008 कोटीचा केंद्र शासनाचा निधीतून ट्रांसफार्मर आणि सबस्टेशन्स उभारणी
तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार
4. लातूर-
शेतमालाचा भाव, बी बियाणे आणि खताचे वाढलेले भाव
काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हा नवीन चेहरा... शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार असं काँग्रेसकडून करण्यात आलेलं प्रेझेंटेशन.
भाजपाकडून राम मंदिर देशाची सुरक्षा.. देशाची निवडणूक... आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे माडले गेलेले मुद्दे
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली बेरोजगारीचा विषय.....
काँग्रेसकडून रेल्वे बोगीं प्रकल्पात कोणालाही काम मिळालं नाही अशी टीका करण्यात आली...
तर भाजपाकडून रेल्वे बोगी सारखा मोठा प्रकल्प लातूर जिल्ह्यात आला आणि अनेक लोकांच्या हाताला भविष्यात काम मिळेल असा प्रचार करण्यात आला
संविधान बदलाचा विषय दोन्ही बाजूं कडून वापरण्यात आला आहे
5. सोलापूर-
तरुणांना रोजगाराची संधी
सोलापूरच्या पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न
सोलापूर आयटी उद्योग, विमानतळ सुरु करणे
शिवाय धार्मिक मुद्यावर देखील निवडणूक प्रचार
स्थानिक आणि उपरा उमेदवार अशा मुद्यावरून ही निवडणूक रंगली
6. माढा-
उजनी धरणाच्या पाणी वाटपात झालेली दुरावस्था
शेतमालाला नसलेला भाव , राज्य सरकारचे शेती संदर्भात चुकीचे धोरण , कांदा निर्यात बंदी असे विषय नंतर मोहिते पाटील यांनी प्रचारात आणले ..
याविरुद्ध खासदार रणजित निंबाळकर यांनी सांगोला , माढा , करमाळा आणि माळशिरस या भागात केलेल्या सिंचन योजनांचा मुद्दा घेतला . ज्या माळशिरस तालुक्याच्या २२ गावांना कधीही पाणी मिळू शकले नव्हते त्यासाठी ९८० कोटीच्या योजनेचे टेंडर काढून दाखवले .
सांगोला तालुक्यासाठी ८९० कोटी रुपयाच्या सिंचन योजनेच्या कामाला झालेली सुरुवात , सांगोला तालुक्याला टेम्भू , म्हैसाळ , नीरा आणि उजनीचे पाणी मिळवून दिल्याचा मुद्दा प्रचारात आणला . मतदारसंघात गावोगावी झालेल्या रस्त्यांचे जाळे , फलटण ते पंढरपूर हा अनेक वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग कामाला झालेली सुरुवात , अशा गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामाबाबत निंबाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे .
मोहिते पाटील यांनी भाजपकडून लाभ घेत गद्दारी केल्याचा मुद्दा सांगताना मोहिते पाटील यांच्या संस्थात ज्यांचे पैसे अडकले किंवा बुडाले असतील ते काढून देणार , त्यांचा दहशतवाद संपवणार असा प्रचार निंबाळकर करीत आहेत .
7. सांगली
सांगली लोकसभेच्या प्रचारात यंदा विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या 10 वर्षाच्या कारकीर्दवर विरोधी उमेदवाराकडून टीका करण्यात आली, ज्यात जिल्ह्यातील विमानतळाचा आणि ड्रायपोर्ट रेंगाळलेला मुद्दा यावरून संजयकाका वर टिका झाली
संजयकाकांच्या 10 वर्षाच्या खासदारकी च्या माध्यमातून सिंचन योजनांना मिळालेली गती ,जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारीत प्रकल्प योजनाचे सुरू झालेले।काम आणि जिल्ह्यात झालेंल्या हायवमुळे वाढलेले दळणवळण यावर भाजपकडून प्रचारात जोर देण्यात आला
महाविकासा आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात उमेदवारीवरून झालेल्या रस्सीखेचाचा मुद्दा देखील या लोकसभेच्या निवडणुकीत गाजला. अखेर चंद्हार पाटील यांना मविआची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली ज्याची चर्चा झाली
8. सातारा-
तरुणांची it हब करण्याची मागणी
उच्च शिक्षिण देणाऱ्या मोठ्या संस्थांची साताऱ्यात उभारणी करावी
उच्च शिक्षणाबरोबर नोकरीसाठी साताऱ्यात मोठ्या कंपन्या झाल्यास युवकांना मुंबई पुणे जावे लागणार नाही
धरण ग्रस्थांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागावेत
दुष्काळी भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी धरणांची प्रलंबीत प्रश्न मार्गी लागावेत.
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विकास - खासदार असून देखील मतदार संघाचा विकास झाला नाही. असा आरोप विद्यमान खासदारवर केला जात आहे. तर, राणे यांनी केवळ स्वतःचा विकास केला असा आरोप राऊत यांनी राणे यांच्यावर केला आहे.
दडपशाही - सत्ताधारी दडपशाही करत आहेत. ती उद्या वाढेल असा आरोप विद्यमान खासदार राऊत राणे यांच्यावर करत आहेत.
रोजगार - विद्यमान खासदार रोजगार देण्यासाठी असमार्तन ठरलं असा आरोप महायुतीकडून केला जात आहे. त्यामुळे कोकणातील रोजगार हा कळीचा मुद्दा आहे.
कोकणी अस्मिता - कोकणचा विकास करत असताना, मतदान करत असताना कोकणातील शांती अबाधित राहिली पाहिजे. कोकणी अस्मिता जपली पाहिजे असा एक प्रचार केला जात आहे.
10. कोल्हापूर
महाविकास आघाडीचे मुद्दे
विद्यमान खासदार संजय मंडलिक निष्क्रिय असल्याचा आरोप.. गेल्या पाच वर्षात मंडलिक त्यांच्याकडून अपेक्षित काम झाले नाहीत
उद्योग वाढीसह आयटी पार्क आणि अन्यप्रलंबित विषयावर मंडलिकांवर टीकास्त्र
संजय मंडलिक यांचा नागरिकांशी संपर्क नसल्याचा आरोप
महायुतीचे मुद्दे
शाहू महाराज यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचे श्रेय घेऊ नये..
विद्यमान शाहू महाराज यांनी सामाजिक आणि राजकीय काम काय केलं
शाहू महाराज यांच्यासोबत नागरिकांनी संपर्क कसा साधायचा न्यू पॅलेस वर सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार का?
शाहू महाराज यांचं वय झालं आहे बोलताना अडखळतात संसदेमध्ये मुद्दे कसे मांडणार
11. हातकणंगले
भाजपचे मुदेदे- भाजपच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यावर भर दिला जात आहे.
धैर्यशील माने यांनी ८२०० कोटी रुपयांच्या कामांचा तपशील द्यायला सुरुवात केली आहे.
राजू शेट्टी मुद्दे- इचलकरंजीतील पाणी प्रश्न, वस्त्रोद्योग या दोन मुद्द्यांमुळे गतवेळी शेट्टी यांची संसदेत जाण्याची वाट रोखली गेली. या प्रश्नाबाबत आपण नेमके काय केले यावर त्यांनी प्रचारात भर. ग्रामीण भागातील जनता, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर त्यांची मुख्य मदार आहे. साखर कारखानदार विरोधातील लढाई असे स्वरूप त्यांनी यावेळच्या निवडणुकीला देऊन हक्काचा मतदार जवळ करण्यावर भर दिला आहे.
माविआचे मुद्दे- आजी-माजी खासदारांतील दोष मतदारांसमोर दाखवत चांगला पर्याय समोर येत असल्याचा मुद्दा ते ठसवत आहेत. पश्चिमेकडील भागाला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळाले ही त्यांची जमेची बाजू.