एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024: मतमोजणीच्या अगोदर नायगांवमध्ये 16 राउंडसह दोन आरोपी अटक; म्होरक्या फरार

Vasai News: लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या अवघ्या काही तास आधी वसईच्या नायगांव पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे.

Lok Sabha Election 2024:  वसई : लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या (Lok Sabha Election Conunting) दोन दिवस अगोदरच वसईच्या नायगांव पोलिसांनी (Naigaon Police) एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. एका इनोव्हा कारमध्ये आलेल्या दोघां आरोपींना 16 राउंडसह अटक केली आहे. तर यात एक सराईत गुन्हेगार हत्यार घेऊन फरार झाला आहे.  

रविवारी दुपारी नायगांवच्या परेरा नगर येथे एका इनोवा कारमध्ये काहीजण हत्यारं घेवून आल्याची माहिती नायगांव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केल्यावर यातील सराईत आरोपी विकी भरत म्हात्रे फरार होण्यास यशस्वी झाला, तर त्याचे साथीदार कल्पेश रामदास वैती, नऊश नरेश नांदोरकर या दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. पोलिसांना गाडीतून 16 जिवंत काडतूस मिळालं आहे. विकी म्हात्रेवर याअगोदर ही तीन वेळा गोळीबार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रफुल्ल तांगडी याच्यावर 23 जानेवारी 2021 रोजी चार राउंड फायर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात ते सुदैवानं बचावले होते. तांगडी यांनी विकी म्हात्रे हा सराईत गुन्हेगार असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मोकळा कसा? असा सवाल उपस्थित केला आहे. तर हा पुन्हा मला मारण्यासाठी नायगाव येथे आल्याचा आरोप करत, आरोपी विकी हा भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, विकी हा आपल्या साथीदारांसोबत येथे कोणत्या मोठ्या कारवाईला अंजाम देण्यासाठी आला होता. याचा तपास आता नायगांव पोलीस करत आहे. 

भिवंडीत लोकसभा निवडणुकीसाठी चुरस, तिरंगी लढत 

लोकसभा निवडणुकांच्या निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. अशातच भिवंडीचं मैदान कोण मारणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्यातच भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा ठोकत आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला आहे.

भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधून माजी खासदार सुरेश टावरे, जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे मात्तबर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget