मोठी बातमी : संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात शिवसैनिकाला तिकीट!
छत्रपती संभाजीनगरसाठी महायुतीचा उमेदवार ठरला आहे. या जागेवर आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे.
![मोठी बातमी : संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात शिवसैनिकाला तिकीट! lok sabha election 2024 sandipan bhumre will contest from chhatrapati sambhajinagar against chandrakant khaira मोठी बातमी : संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात शिवसैनिकाला तिकीट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/9a57124668b98302b61998d8e658f2481713520834085988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (19 एप्रिल) पार पडले. एकीकडे मतदानाचा पहिला टप्पा संपलेला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यात जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. महायुतीतत (Mahayuti) नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगराचाही (Chhatrapati Sambhajinagar) समावेश आहे. दरम्यान, या जागेसाठी महायुतीचा उमेदवार आता ठरला आहे. येथून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना दिले 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चंद्रकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे असा होणार सामना
महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार, असे विचारले जात होते. शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार
संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमघ्ये लढाई रंगणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतच संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
वंचितनेही दिला उमेदवार, नेमके काय होणार?
दरम्यान, संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येथे शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पक्की झाली आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. वंचितच्या या उमेदवाराचा चंद्रकांत खैरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा
सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा काही संबंध नाही, सांगलीच्या उमेदवारीवर काय म्हणाले जयंत पाटील?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)