रावेरमध्ये रक्षा खडसेंविरोधात कोण? सासरे की नणंद? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Raver Lok Sabha : जळगाव जिल्ह्यात रावेर मतदार संघात भाजपनं विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे उमेदवार राहतील, असं सागितलं जात होतं.
Raksha Khadse and Rohini Khadse : जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात रावेर मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपने (BJP) रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी दिली. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कालच्या बैठकीत जोर धरू लागली आहे. त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेर मतदार संघात भाजपनं विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे उमेदवार राहतील, असं सागितलं जात होतं. मात्र, आपली प्रकृती बरी नसल्याचं कारण देत एकनाथ खडसे यांनी डॉक्टरांनी परवानगी दिली, तरंच आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि महिला प्रदेशाध्यक्षआ अध्यक्षा रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाशिक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, शरद पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. रोहिणी खडसे यांच्या उमेदवारी बाबत शरद पवार यांच्या कडे मागणी करण्यात आली असली तरी त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, या सर्व प्रकारात एकनाथ खडसे हे उमेदवार म्हणून राहण्याची शक्यता आता जवळपास नसल्या सारखं मानलं जात आहे. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना होऊ शकतो. मात्र, अशीही शक्यता कमी असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे.