(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बघतोच..जिरवतो...अजित पवार यांच्याकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकीची भाषा, दादांचा एवढा संताप का झाला?
अजितदादा म्हणजे एक घाव दोन तुकडे...दादा कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत दादांचा वेगळा रागरंग दिसून आला.
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या भाषेची पातळीसुद्धा कधीकधी खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पण यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषा मात्र अधिक खटकणारी होती. जमेल तेव्हा आणि जमेल तिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकी देण्याचा सपाटाच त्यांनी लावला अजितदादांचा (Ajit Pawar) संताप का झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
अजितदादा म्हणजे एक घाव दोन तुकडे...दादा कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत दादांचा वेगळा रागरंग दिसून आला. आपल्या उमेदवारांसाठी घेत असलेल्या प्रचारासभेत दादांच्या तोंडी प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल चक्क धमकीची भाषा दिसायला लागलीय.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांनी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. अमोल कोल्हेंवर टीका केली. काही दिवसांपूर्वी अजितदादांनी शिरुरचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांना उघड-उघड धमकी दिली होती.
अमोल कोल्हेंवर काय टीका केली?
बिबट्यामुळे कुत्रा राहिला नाही म्हणून बिबट्या माणसांवर हल्ला करु लागला. बिबट्यासमोर कोल्हेला सोडा.', असा टोला त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.
बजरंग सोनावणेंवर काय टीका केली?
पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, बजरंगा तू सांगायाचा छाती पडला की हे दिसतो तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती पडली की मरून जातो... तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनावणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बर चालले होते, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे मस्ती त्याला आली.
2019 मध्ये अजितदादांची विजय शिवतारेंना धमकी?
पारनेरमध्ये अजितदादांनी निलेश लंके यांच्याबाबतीत जिरवण्याची भाषा केली.निवडणुकीच्या आधीही अजितदादांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता.2019 मध्ये अजितदादांनी विजय शिवतारेंना आमदार कसे होता ते बघतोच अशी धमकी दिली होती.अजित दादांचा हा तापट स्वभाव यंदाच्या निवडणुकीत वारंवार दिसून येतोय..
अजित दादांचा संयम संपत चाललाय?
धरणाचं वक्तव्य भोवल्यानंतर दादा बोलताना काळजी घ्यायला लागले होते. पण या निवडणुकीत त्यांचा संयम संपत चालल्याचं त्यांच्या भाषेवरून दिसून येतंय. महायुतीत दादांच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी बारामतीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचं दडपण त्यांच्यावर असलं तरी त्यांची बघून घेण्याची भाषा मात्र लोकांच्या पचनी पडणारी नाही.
Video: