एक्स्प्लोर

Laxman Hake: देवा, मला पुढचा जन्म ब्राह्मण समाजात दे, म्हणजे... नितीन गडकरींच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची खोचक टीका

Laxman Hake on Nitin Gadkari: तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना हाके म्हणाले मी सुद्धा देवाला प्रार्थना करेन की पुढच्या जन्म मला ब्राह्मण समाजात दे. कारण जावे ज्यांच्या वंशा तेव्हा त्यांना कळे एवढाच संदेश मी नितीन गडकरी साहेबांना देईन, असंही ते म्हणालेत.

पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत असून सर्वत्र तिची चर्चा आहे. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचे सांगितले. यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला. हाके यांनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र तरुणाने हाके यांना चांगलाच समज देत त्यांची लाज काढली. हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लीपवरती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हेतू असल्याचं हाके म्हणाले आहेत.

 हाके म्हणाले, त्याच माणसाला प्रश्न विचारला पाहिजे. तुमचा ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का? मी त्यांना पैसे मागायला फोन नाही केला, त्यामुळे माझ्या हेतू विषयी शंका उपस्थित करण्यापेक्षा पैसे देणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करण्यासाठी वारंवार असे प्रयत्न होत आहे, त्यामुळे हाकेची चळवळ थांबणार नाही, हाकेची  ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, यांचे प्रश्न उपस्थित होत आहेत, आरक्षण गेल्याबद्दल आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनाला बदनाम करणं, हा क्यांचा गेतू आहे, हाकेला बदनाम करा काही फरक पडणार नाही, असंही लक्ष्मण हाके असंही त्यांनी म्हटलं आहे. ओबीसी आंदोलन थांबावं यासाठी मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचलं जात आहे, असंही हाकेंनी पुढं म्हटलं आहे.

Laxman Hake on Nitin Gadkari: गडकरींच्या वक्तव्यावर हाकेंची प्रतिक्रिया 

तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना हाके म्हणाले मी सुद्धा देवाला प्रार्थना करेन की पुढच्या जन्म मला ब्राह्मण समाजात दे. कारण जावे ज्यांच्या वंशा तेव्हा त्यांना कळे एवढाच संदेश मी नितीन गडकरी साहेबांना देईन, असंही ते म्हणालेत. तर 
मनोज जरांगे यांनी दिल्लीत नाही तर परदेशात आफ्रिकेत जावं तिथं गरज आहे. ओबीसी नेत्यांची धागे प्रस्थापितांच्या हाती आहे, त्यामुळे ओबीसी नेते एकत्र यायला वेळ लागतोय असंही ते पुढे म्हणालेत.

हाकेंची ऑडीओ क्लीप व्हायरल (Viral Audio Clip)

लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचे सांगितले. यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला. हाके यांनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र तरुणाने हाके यांना चांगलाच समज देत त्यांची लाज काढली. हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय? (Viral Audio Clip)

लक्ष्मण हाके - बोला 

तरुण: तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला किंवा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढा आपल्यासाठी पळत आहे 

लक्ष्मण हाके - काय देताय मानधन...कुठलं गाव 

तरुण - अकलूज.. तुम्हाला कधी समोर कुठे भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळत आहे... गाडीसाठी तेल लागतं... तर कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे...

लक्ष्मण हाके - धन्यवाद दादा .... भेटल्यावर द्या...

तरुण - तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर... त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल...

लक्ष्मण हाके - नाही राहू द्या... अकलूज परिसरात आल्यावर भेटू ..

तरुण : नाही... भेटण्यापेक्षा युपी आयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते.. डायरेक्ट... तुम्ही कधी यायचा काय... आम्ही पण बाहेर पुण्याला असतो...

लक्ष्मण हाके - पुण्यातच आहे मी राहायला... कुठे राहता...

तरुण - कोथरूड 

हाके : उद्या आहे पुण्यात सकाळी...

तरुण - ऑफिसला जाताना येतो... तुमचा युपीआय नंबर असेल तर द्या ना...

हाके - पाठवतो एक मिनिट... रितेश गुगल पे फोन पे नंबर दे...

तरुण: सांगता का मला 

हाके - रितेश बाहेरवाड यांनी फोन पे नंबर सांगितला...

तरुण - सरांचा फोन पे नंबर नाही का...

हाके - ऐका ना माझा अकाउंट नाही... रितेश माझा ड्रायव्हर आहे... अकाउंटला मी पैसे घेत नाही...

तरुण - तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हालाच सहकार्य करतेत ... तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे घेता... सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याच बोलता... लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला... जनाची नाही तर मनाची... समाजाच्या विरुद्ध भडकवताय. . जरांगेंला बोलता.... सुपार्‍या घेता... जनाची नाही तर मनाची... शहाजी बापूच्या विरोधात उभारला 200 मते पडली नाहीत.... तुझी औकात नाही साल्या.... तू समाजाच्या विरोधात काम करतो...
फोन कट

मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही...नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत (Nitin Gadkari)

ब्राह्मण समाजाला (Brahmin Community) आरक्षण (Reservation) दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. (Nagpur Marathi News)

मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात बामणांना फार महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी मिश्रा, या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे, तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget